February 2, 2023
हत्तीचे पिल्लू पाणी पीत असताना अचानक मगरीने हल्ला केला अन्…; थरकाप उडवणारा Viral Video एकदा पाहाच

प्राण्यांचे अनेक व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ प्राण्यांचे गोंडस हावभाव दाखवणारे असतात तर काही त्यांचे रौद्र रूप दाखवणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हत्तीच्या पिल्लावर एका मगरीने हल्ला केल्याचे दिसत आहे. नेमकं यावेळी काय घडलं जाणून घ्या.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये हत्तीचा कळप पाणी पिण्यासाठी एका पाणवठ्याजवळ उभा असलेला दिसत आहे. त्यांच्यामधील एक पिल्लू पाणी पीत असताना अचानक त्याच्यावर मगर हल्ला करते. अचानक झालेल्या हा हल्ल्यामुळे पिल्लू गोंधळते आणि मागे सरकण्याचा प्रयत्न करते, पण मगरीने त्याची सोंड दातात घट्ट पकडल्याने त्याला स्वतःची सुटका करणे कठीण जाते. तेव्हा तिथे असणारे हत्ती त्या पिल्लाच्या मदतीसाठी पुढे येतात आणि मगरीला हुसकावण्याचा प्रयत्न करतात. अखेर पिल्लाची सुटका करण्यात त्यांना यश मिळते. पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ.

व्हायरल व्हिडीओ :

हा व्हिडीओ ‘वाईल्ड लाईफ कल्चर १’ या instagram अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.