February 1, 2023
oneplus-nord-ce-2-lite-5g

OnePlus आणि Redmi स्मार्टफोन्स Amazon India वर बेस्ट सेलर राहिले आहेत. तुम्हाला परवडणारा OnePlus फोन OnePlus Nord CE 2 Lite 5G आणि Redmi चा स्वस्त फोन Redmi 9A Sport देखील खरेदी करायचा असेल तर चांगली संधी आहे. Redmi च्या फोनवर ७ हजार रुपयांपेक्षा जास्त सूट मिळेल. तर OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोन खरेदी करण्यावर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरसह १३ हजार रूपयांपेक्षा जास्त बचत करण्याची संधी आहे. आम्ही तुम्हाला Amazon च्या बेस्टसेलर लिस्टमधील टॉप २ स्मार्टफोन्सवर उपलब्ध डील्सबद्दल सांगणार आहोत…

Redmi 9A स्पोर्ट: ६,९९९ रूपये
Redmi 9A Sport ची किंमत Amazon वर ६,९९९ रुपयांना लिस्ट करण्यात आली आहे. ६०० रुपयांचे डिस्काउंट कूपन देखील मिळू शकते. या फोनवर ६,६०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील आहे. हँडसेट १,१६७ रूपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर मिळू शकतो. HSBC कॅशबॅक कार्डद्वारे फोनवर २५० रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळेल.

Redmi 9A Sport मध्ये २ GB रॅम आणि ३२ GB इनबिल्ट स्टोरेज आहे. फोनमध्ये MediaTek Helio G25 प्रोसेसर देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये ६.५३ इंच HD+ डिस्प्ले आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो २०:९ आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सल प्रायमरी रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. हँडसेटला पॉवर देण्यासाठी ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे जी १० W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

आणखी वाचा : डिस्प्लेमध्ये कॅमेरा असलेले Red Magic 7S आणि Red Magic 7S Pro आले भेटीला, किंमत जाणून घ्या

OnePlus Nord CE 2 Lite 5G: रुपये १९,४९९
OnePlus Nord CE 2 Lite 5G ची किंमत १९,४९९ रुपये आहे. हा फोन ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डने २००० रुपयांच्या सवलतीसह घेता येईल. हँडसेटवर ११,५०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील आहे. ३,३३३ रुपयांच्या नो-कॉस्ट EMI वर फोन घेण्याची संधी देखील आहे.

OnePlus च्या या स्वस्त फोनमध्ये ६ GB रॅम आणि १२८ GB इनबिल्ट स्टोरेज आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सल प्रायमरी आणि २ मेगापिक्सल डेप्थ, २ मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर आहे. हँडसेटमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. या OnePlus स्मार्टफोनमध्ये १२० Hz च्या रिफ्रेश रेटसह ६.५९ इंचाचा डिस्प्ले आहे. स्क्रीनची पिक्सेल डेनसिटी ४०२ ppi आहे आणि आस्पेक्ट रेशो २०:९ आहे. हँडसेट डार्क मोडला सपोर्ट करतो आणि यात Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर आहे. OnePlus Nord CE 2 Lite 5G मध्ये Android 12 आधारित Oxygen OS देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी ३३ W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.