December 5, 2022
infinix-inbook-neo

Infinix InBook X1 Neo लॅपटॉप सोमवारी भारतात लॉंच करण्यात आला. विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन Infinix चा हा नवीन लॅपटॉप नवीन इंटेल प्रोसेसरसह मिळतोय. हा लॅपटॉप विंडोज ११ होमवर चालतो. Infinix InBook X1 Neo बनवण्यासाठी अॅल्युमिनियम मिश्र धातुचा वापर करण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये १४ इंचाचा फुलएचडी आयपीएस डिस्प्ले आहे. याशिवाय या बजेट लॅपटॉपमध्ये ८ जीबी रॅम, २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज आणि डीटीएस ऑडिओ सारखी फीचर्स उपलब्ध आहेत.

Infinix InBook X1 Neo price in India
Infinix InBook X1 Neo भारतात ८ GB रॅम आणि २५६ GB इनबिल्ट स्टोरेजसह २४,९९० रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. लॅपटॉपची विक्री २१ जुलै रोजी दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवर सुरू होईल.

आणखी वाचा : Vivo T1X स्पेसिफिकेशन्स लॉंचपूर्वीच लीक, जाणून घ्या माहिती

Infinix InBook X1 Neo specifications
Infinix InBook X1 Neo चे स्पेसिफिकेशन्स अजून कंपनीच्या साईटवर लिस्ट केलेले नाहीत. परंतु फ्लिपकार्ट लीस्टनुसार, Infinix InBook X1 Neo लॅपटॉप विंडोज ११ होमवर चालतो. या लॅपटॉपमध्ये १४ इंचाचा फुलएचडी (१,०८०×१,९२० पिक्सेल) IPS डिस्प्ले आहे. या लॅपटॉपमध्ये Intel Celeron Quad-core N5100 प्रोसेसर, ८ GB रॅम आणि २५६ GB इनबिल्ट स्टोरेज आहे. या लॅपटॉपमध्ये इंटिग्रेटेड इंटेल यूएचडी ग्राफिक्स उपलब्ध आहेत.

आणखी वाचा : Nothing Phone 1 vs OnePlus Nord 2T vs iQOO Neo 6 vs Poco F4 5G: कोणता फोन आहे सर्वात बेस्ट?

Infinix InBook X1 Neo मध्ये दोन USB ३.० पोर्ट, दोन USB Type C पोर्ट आणि एक HDMI १.४ पोर्ट आहे. हा Infinix लॅपटॉप बॅकलिट कीबोर्डसह येतो. लॅपटॉपमध्ये ब्लूटूथ ५.१ कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. व्हिडीओ कॉलसाठी या Infinix लॅपटॉपमध्ये दोन मायक्रोफोनसह HD वेबकॅम आणि DTS ऑडिओ प्रोसेसिंग सारखी फीचर्स आहेत. Infinix InBook X1 Neo ला ५० Wh ची बॅटरी आहे जी USB Type C पोर्टद्वारे फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. बॅटरी चार्जिंगसाठी ४५ W AC अडॅप्टर आहे.

कंपनीचा दावा आहे की Infinix InBook X1 Neo लॅपटॉपला एका चार्जवर ११ तासांचा टॉकटाइम मिळेल. या लॅपटॉपचे वजन १.२४ किलो आहे आणि जाडी १४.८ मिमी आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.