December 1, 2022
E-Aadhaar

आधार हा देशातील नागरिकांना जारी केलेला १२ अंकी ओळख क्रमांक आहे. आता अनेक शासकीय योजनांसाठी आधार कार्ड, ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा वापर केला जात आहे. भारतीयांसाठी आधार कार्ड महत्त्वाचे दस्तऐवज आहे. बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक डेटा या डेटाबेसमध्ये संग्रहित केला जातो. आधार कार्डसाठी नोंदणी केल्यानंतर, युजर्स UIDAI वेबसाईटवरून ई-आधार डाउनलोड आणि प्रिंट करू शकता.

ई-आधार कार्ड डाउनलोड करण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला- एनरोलमेंट नंबर वापरून आणि दुसरा- आधार क्रमांक वापरून. या दोन्ही प्रकारे आधार कसे डाउनलोड करायचे ते जाणून घ्या:

आणखी वाचा : तुम्हाला 5G स्मार्टफोन घ्यायचाय? मग ५० MP कॅमेराच्या Moto G71 5G वर असलेल्या ऑफरचा नक्की विचार करा

Enrollment Number चा वापर करून :
नागरिक २८ डिजिटली एंटर केलेला एनरोलमेंट नंबर, पूर्ण नाव आणि पिन कोड टाकून त्यांचे ई-आधार डाउनलोड करू शकतात. या पद्धतीमध्ये युजर्सच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जातो. युजर्स इच्छित असल्यास OTP ऐवजी TOPTP वापरू शकतात. TOTP mAadhaar मोबाईल अॅपद्वारे जनरेट करता येतो.

Aadhaar Number चा वापर करून :
तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ई-आधार डाउनलोड करण्यासाठी १२ अंकी आधार क्रमांक देखील वापरू शकता. आधार व्यतिरिक्त, तुम्हाला तुमचे पूर्ण नाव आणि पिन कोड टाकावा लागेल. या प्रक्रियेत नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येतो. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही OTP ऐवजी TOTP वापरून ई-आधार डाउनलोड करू शकता. TOTP mAadhaar मोबाईल अॅपद्वारे जनरेट करता येतो.

आणखी वाचा : १३ हजाराची बचत करण्याची संधी, OnePlus Nord CE 2 Lite 5G आणि Redmi 9A Sport स्वस्तात खरेदी करा

ई-आधार डाउनलोड करण्यासाठी या स्पेप्स फॉलो करा:

  • स्टेप १: सर्व प्रथम UIDAI वेबसाइटला भेट द्या https://uidai.gov.in/
  • स्टेप २: त्यानंतर ‘Download Aadhaar’ पर्यायावर जा आणि https://eaadhaar.uidai.gov.in/ लिंकला भेट द्या
  • स्टेप ३: आता Enter your Personal Details वर जा आणि Aadhaar वर टॅप करा
  • स्टेप ४: यानंतर Regular Aadhaar पर्याय निवडा आणि आवश्यक तपशील जसे की तुमचा आधार क्रमांक, पूर्ण नाव आणि पिन कोड प्रविष्ट करा. जर तुमच्याकडे mAadhaar असेल तर तुम्ही TOTP जनरेट करू शकता, अन्यथा तुम्ही OTP पद्धत निवडू शकता.
  • स्टेप ५: ‘Request OTP’ वर क्लिक करा
  • स्टेप ६ : आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला ६ अंकी OTP प्रविष्ट करा
  • स्टेप ७: सर्वेक्षण पूर्ण करा आणि Download करा पर्यायावर क्लिक करा.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.