January 30, 2023
Does Pan Card have an expiry date like Adhar Card?

PAN Card Expiry: आधार कार्ड एक्स्पायरी प्रमाणेच पॅनकार्ड हे देखील एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आता प्रत्येक महत्वाच्या कामात आधार कार्डसोबत पॅन कार्ड देखील महत्वाचे आहे. पॅन कार्ड असल्याशिवाय कोणतीही महत्वाची कामे होऊ शकत नाहीत. बँक टू आयटीआर फाइलिंग (ITR), शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, ऑनलाइन बँकिंग काम यासह अनेक महत्त्वाच्या कामांसाठी पॅन कार्डचा वापर केला जातो. पॅन कार्डमध्ये १० अंकी अल्फा न्यूमेरिक क्रमांक असतो. जर पॅन कार्ड नसले, तर लोकांना आर्थिक व्यवहाराच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

पण तुम्हाला माहीत आहे का की तुमचे पॅन कार्ड किती दिवस वैध आहे आणि त्याची एक्सपायरी डेट असते का? आधार कार्डला जशी एक्सपायरी डेट आहे तशीच पॅन कार्डला देखील आहे का? कदाचित काही लोकांना पॅन कार्डची मुदत आणि वैधता याबद्दल माहिती असेल, परंतु अनेकांना त्याबद्दलची माहिती नसेल. जर तुमच्या मनात पॅन कार्डच्या एक्सपायरीबद्दल संभ्रम असेल तर इथे तुम्हाला त्याची वैधता आणि एक्सपायरीबद्दल माहिती देणार आहोत.

(हे ही वाचा: आता IRCTC खाते आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक! येथे संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या)

पॅन कार्डची वैधता

कोणत्याही व्यक्तीची पॅनकार्डची वैधता NSDL द्वारे जारी केली जाते. हे कार्ड आयुष्यभर वैध राहते. तथापि, पॅन कार्डमध्ये काही बदल केल्यास, आपण ते ऑनलाइन किंवा ऑफलाइन अद्यतनित करू शकता, त्याची माहिती प्राप्तिकरला द्यावी लागते.

कोणत्या प्रकारची माहिती लपवली जाते

पॅनकार्डमध्ये सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांची माहिती दडलेली असते. यात १० अंकी अल्फा न्यूमेरिक क्रमांक असतो. पहिले अंक इंग्रजी अक्षरांनी सुरू होतात. यासोबतच पॅन कार्डमध्ये युजर्सची स्वाक्षरी आणि फोटो आणि पत्ताही असतो. एक वापरकर्ता फक्त एक पॅन कार्ड ठेवू शकतो. एका वापरकर्त्याला दोन पॅन कार्ड ठेवण्याची परवानगी नाही आहे.

( हे ही वाचा: पेटीएम घेतंय मोबाईल रिचार्जवर पैसे ; जाणून घ्या कोणते ॲप देत आहेत मोफत सेवा)

अपडेट कुठे करू शकतो?

जर कोणी पॅनकार्ड मध्ये महत्वाची माहिती अपडेट करणार असेल, तर त्यासाठी NSDL वेबसाईटवर जावं लागेल. याशिवाय तुम्ही इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर जाऊन पण तुमची महत्वाची माहिती अपडेट करू शकता. बाकी, वैधतेबद्दल बोलायला गेलं तर याची एक्सपायरी लाइफटाईम असते.





Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.