December 5, 2022
OnePlus Nord CE 2 Lite 5G

iPhone ला टक्कर देणारा कॅमेरा आणि अँड्रॉइड मधील सर्व टॉप फीचर्स यासाठी प्रसिद्ध OnePlus मोबाईल आता परवडणाऱ्या किंबहुना त्याहून स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकतो. Amazon Great Freedom Festival Sale मध्ये कंपनीतर्फे वनप्लसची आजवरची सर्वात स्वस्त डील देण्यात येत आहे. OnePlus Nord CE 2 Lite 5G हा मोबाईल कंपनीतर्फे एप्रिल महिन्यात लाँच करण्यात आला होता. OnePlus X नंतर सर्वात स्वस्त फोन म्हणून हा मोबाईल बाजारात दाखल झाला होता आणि आता लाँच नंतर चार महिन्यातच Amazon वर OnePlus चे लेटेस्ट व्हर्जन अवघ्या ४९९९ रुपयात उपलब्ध आहे. ही कमाल डील आपण कशी व कधीपर्यंत मिळवू शकता हे जाणून घेऊयात..

Amazon Great Freedom Festival Sale मध्ये १० ऑगस्ट पर्यंत अनेक उपकरणांवर मोठी सूट मिळत आहे. Nord CE 2 Lite 5G वर सुद्धा ऍमेझॉन कडून १००० रुपये सूट देण्यात आली आहे.

OnePlus तर्फे OnePlus Nord CE 2 Lite 5G हा १९,९९९ रुपयात लाँच करण्यात आला आहे, मात्र सेल दरम्यान विविध बँक डिस्काउंट व एक्सचेंज ऑफर्सचा लाभ घेऊन आपण हा मोबाईल केवळ ४९९९ मध्ये मिळवू शकता.

आपण ५००० च्या किमान कार्ट व्हॅल्यूसहा जर का ईएमआय चा पर्याय न वापरता आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड वापरून एकत्र पेमेंट करणार असाल तर आपल्याला आणखीन ७५० रुपये सूट मिळू शकते. तर ईएमआय सह आपण १२५० रुपयांची सूट मिळवू शकतो. काही विशेष क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट ईएमआय सुद्धा उपलब्ध आहेत. प्राइम मेंबर्स Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड सह 5% कॅशबॅक सुद्धा मिळवू शकतात.

याचा अर्थ असा की जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्ड सह ईएमआय शिवाय पेमेंट केले तर आपण हा फोन १८, २४९ मध्ये तर ईएमआय सह १७, ७४९ मध्ये आपण विकत घेऊ शकता. इतकंच नाही तर जर तुम्ही तुमचा जुना फोन देऊन आपण नवीन फोन घेणार असाल तर तुमच्या फोनच्या परिस्थितीनुसार आपल्याला थेट १२,७५० पर्यंत मोठं डिस्काउंट मिळू शकते. ज्यासह फोनची किंमत ४९९९ रुपये इतकी कमी होईल.

लक्षात ठेवा ही ऑफर केवळ १० ऑगस्ट पर्यंत लागू आहे त्यामुळे तुम्हीही जर का तुमचा जुना फोन बदलून नवीन अप टू डेट पण स्वस्त फोन घेऊ इच्छित असाल तर त्वरित ही डील वापरून पहा.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.