December 1, 2022
Prime-Day-sale

Amazon Prime Day 2022 सेल येत्या २३ आणि २४ जुलै पासून सुरू होणार आहे. या सेलमध्ये मोबाईल फोन, टीव्ही, एसी, अ‍ॅमेझॉन प्रोडक्टसह इतर अनेक वस्तूंवर सूट मिळणार आहे. मात्र, अ‍ॅमेझॉनने विक्रीपूर्वीच काही प्रोडक्टवर डिस्काउंट ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. हा दोन दिवसांचा सेल केवळ प्राइम सदस्यांसाठी आयोजित केला आहे. तुम्हालाही सेलमध्ये खरेदी करायची असेल, पण तुमच्याकडे प्राइम मेंबरशिप नसेल, तर आम्ही तुम्हाला Amazon प्राइम सबस्क्रिप्शन मोफत कसे घेता येईल ते सांगणार आहोत.

Amazon Prime Subsription
अ‍ॅमेझॉन प्राइमवर ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लाभ देण्याच्या दृष्टीनेच रचना करण्यात आली आहे. प्राइम सबस्क्रिप्शनसह, युजर्सना अधिक चांगला खरेदी आणि मनोरंजनाचा अनुभव मिळतो. सध्या जगभरात २०० दशलक्ष पेड प्राइम मेंबर्स आहेत. भारतातील प्राइम सदस्यत्वासह युजर Amazon वरून खरेदी करताना मोफत शिपिंग, प्राइम व्हिडीओवर अनलिमिटेड चित्रपट आणि टीव्ही शो यांसारख्या सेवेचा आणि प्राइम म्युझिकवर ९० दशलक्ष गाणी आणि पॉडकास्ट भागांचा जाहिरातीशिवाय अनुभव घेऊ शकतात. याशिवाय, लाइटनिंग डील्सचा झटपट एक्सेस आणि प्राइमसह गेमिंग यांसारखी फीचर्स देखील उपलब्ध आहेत. तुम्ही http://www.amazon.in/prime ला भेट देऊन Amazon सदस्यत्वाशी संबंधित अधिक माहिती मिळवू शकता.

Amazon Prime Subscription Price
ई-कॉमर्स दिग्गज अ‍ॅमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शनसाठी अनेक प्लॅनऑफर करण्यात येत आहेत. या प्लॅन अंतर्गत तुम्हाला दोन दिवसांत मोफत शिपिंग, अ‍ॅमेझॉन वरून कोणतेही प्रोडक्ट घेतल्यावर विक्रीदरम्यान झटपट एक्सेस, प्राइम व्हिडीओ, अ‍ॅमेझॉन म्युझिक यासारख्या सुविधा मिळतात. Amazon Prime सदस्यत्वाच्या १ वर्षाच्या प्लॅनची किंमत १,४९९ रुपये आहे. तर १ महिन्याच्या प्लॅनची ​​किंमत १७९ रुपये आहे.

याशिवाय तुमचे वय १८ ते २४ वर्षांच्या दरम्यान असेल तर Youth Offer सह तुम्ही ५० टक्के सूट देऊन प्राइम मेंबरशिप घेऊ शकता. यासाठी, Amazon वर साइनअप करताना तुमचे वय व्हेरिफाय केले जाईल.

How to get free Amazon Prime membership in India? | विनामूल्य Amazon प्राइम सबस्क्रिप्शन मिळवण्याची संधी

असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही भारतात फ्री Amazon प्राइम मेंबरशिप मिळवू शकता. चला तुम्हाला या पद्धतींबद्दल सर्व काही सांगूया…

Sign up for a free trial | फ्री ट्रायलसाठी साइन अप करा
Amazon ने प्राइम सबस्क्रिप्शनसाठी मोफत ट्रायल देणे बंद केले आहे. परंतु तरीही तुम्ही ३० दिवसांच्या Amazon Prime Video ट्रायलसाठी साइन अप करू शकता. साइन अप केल्यानंतर तुम्ही सर्व Amazon वेबसाइट्स आणि अ‍ॅप्सवर ३० दिवसांसाठी सर्व प्राइम बेनिफिट्सचा लाभ घेण्यास सक्षम असाल. Amazon Prime Video ची ट्रायल सेवा फक्त तेव्हाच काम करेल जेव्हा तुम्ही याआधी प्राइमची सदस्यता घेतली नसेल.

मोबाईल आणि ब्रॉडबँड प्लॅनसह फ्री Amazon प्राइम सबस्क्रिप्शन
मोफत Amazon प्राइम सबस्क्रिप्शन मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे मोफत Amazon प्राइम सबस्क्रिप्शन ऑफर करणार्‍या टेलिकॉम कंपनीच्या प्लॅनवर स्विच करणे. लक्षात ठेवा की कंपन्या त्यांच्या प्लॅनमध्ये सतत बदल करत असतात, त्यामुळे हे प्लॅन्स तपासत राहा.

रिलायन्स जिओबद्दल बोलायचं झालं तर कंपनीच्या सर्व पोस्टपेड प्लॅनमध्ये Amazon प्राइम मेंबरशिप मोफत उपलब्ध आहे. Amazon प्राइम सबस्क्रिप्शन कंपनीच्या ३९९ रुपये, ५९९ रुपये, ७९९ रुपये, ८९९ रुपये आणि १,४९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये विनामूल्य उपलब्ध आहे.

दुसरीकडे, Amazon प्राइम मेंबरशिप एअरटेलच्या ३४९ रुपये, ४९९ रुपये, ७४९ रुपये, ९९९ रुपये आणि १,५९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये मोफत उपलब्ध आहे.

Vodafone Idea (Vi) चे ग्राहक मोफत Amazon प्राइम सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी ४९९, ६९९ आणि १,०९९ रूपयांचे पोस्टपेड प्लॅन निवडू शकतात.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.