February 2, 2023
Apple

अमेरिकन कंपनी अॅपलने आपल्या पुरवठादारांना आयपॉड आणि बीट्स हेडफोनचे काही उत्पादन भारतात हलवण्यास सांगितले आहे. आयपॉड आणि बीट्स हेडफोन्सचे उत्पादनही भारतात सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. आयफोनची निर्मिती भारतात आधीच सुरू आहे. बुधवारी निक्केई वृत्तपत्रात दिलेल्या वृत्तानुसार, अॅपल भारतात केवळ आयफोनचे उत्पादन वाढवत नाही तर येथे इतर उत्पादनांचे उत्पादन सुरू करण्याच्या योजनांवरही काम करत आहे. भारतासाठी ही मोठी सकारात्मक बाजू असेल. यातून भारत जागतिक पुरवठा साखळीचा मुख्य घटक म्हणून उदयाला येण्याची शक्यता निर्माण होईल.

तसेच भारतात आयफोनची निर्मिती करणारी फॉक्सकॉन कंपनी हे बीट्स हेडफोन तयार करण्याच्या तयारीत असल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. या रिपोर्टनुसार, ॲपलचे हे एअरपॉड्स चीन आणि व्हिएतनाममध्ये उत्पादित केले जातात. लक्सशेअर प्रिसिजन इंडस्ट्री या वायरलेस एअरपॉड्सच्या निर्मितीचं काम करते. पण फॉक्सकॉनने ही कमान आपल्या खांद्यावर घेतली असली तरी अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

आणखी वाचा : Apple Watch ने महिलेला दिली Good News; डॉक्टरही झाले चकीत! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…

अॅपलने २०१७ मध्ये भारतात सप्लायर विस्ट्रॉन सोबत मिळून आयफोनचं उत्पादन सुरू केलं होतं. कंपनीची नवीन आयफोन १४ सीरीज देखील भारतातच तयार केली जाईल. यापूर्वीही कंपनीने भारतात उत्पादन करण्याचा विचार केला होता. आता मात्र कंपनी भारताला उत्पादन बेस बनविण्याचं काम करत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात भारतात तयार होणारी उत्पादने युरोपसह अन्य बाजारपेठांमध्येही निर्यात करण्यात येतील. 

मंगळवारीच ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटले आहे की, आयफोन प्रामुख्याने भारतातून युरोप आणि मध्य-पूर्व देशांमध्ये निर्यात केले जातात. गेल्या पाच महिन्यांत भारतातून आयफोनची निर्यात १ अरब अब्ज झाली आहे. यावरुन असे दिसून येते की, भारत वेगाने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मार्चपर्यंत भारतातून आयफोनची निर्यात अडीच पटीने वाढू शकते भारतातून आयफोन निर्यातीच्या वाढीच्या सध्याच्या गतीनुसार, पुढील वर्षी मार्चपर्यंत हा आकडा अडीचपट म्हणजे २.५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.