December 5, 2022
Apple Lockdown Feature

आपल्या वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी अ‍ॅपल एका नवीन सेफ्टी फीचरवर काम करत आहे. या आगामी पर्यायाच्या मदतीने, कंपनी आपल्या वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यास सक्षम असेल. या फीचरचे नाव लॉकडाउन (Apple’s Lockdown Mode) असेल. हे नवीन मोड लॉंच केल्यानंतर, इस्रायल-आधारित एनएसओ ग्रुप पेगासस आणि इतर देशांतील एजन्सी देखील वापरकर्त्यांच्या डेटा चोरू शकणार नाहीत. हे फीचर्स अ‍ॅपलच्या आयफोन, आयपॅड आणि मॅक्स या उत्पादनांवर काम करतील आणि त्यांच्यासाठी सुरक्षा फीचर तयार करतील.

समोर आलेल्या माहितीनुसार, नवीन प्रायव्हसी फोकस फीचर्स आयओएस १६, आयपॅड ओएस १६ आणि मॅकस ओएससह सादर केले जातील. अ‍ॅपलने सांगितले आहे की त्याचा लॉकडाउन मोड एक एक्सट्रीम ऑप्शनल प्रोटेक्शन आहे. ज्यांना त्यांचा डेटा लीक झाल्यावर खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशा लोकांसाठी हे खूप उपयुक्त ठरू शकते.

वेबसाइट खरी आहे की बनावट हे ओळखणे झाले सोपे; मिनिटांमध्ये कळणार सत्यता

हाई सिक्योरिटी प्रोटेक्शन फीचर

अ‍ॅपल आपल्या प्रायव्हसी टूल्समध्ये असे सुरक्षा कवच तयार करत आहे की इस्रायल-आधारित एनएसओ ग्रुपद्वारे संचालित पेगासस देखील डेटा हॅक करू शकणार नाही. अ‍ॅपलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की लॉकडाउन मोडच्या मदतीने आयफोन, आयपॅड आणि अ‍ॅपलच्या मॅक्समध्ये एक मजबूत सुरक्षा स्तर दिला जाईल, जो अनेक सरकारी एजन्सीही मोडू शकणार नाहीत.

फेसटाइम आणि वेब ब्राउझिंगमध्ये देखील प्रवेश करू शकणार नाही

यामध्ये युजर्सचे वेब ब्राउझिंग, अ‍ॅपलची सर्व्हिस फेस टाइम आणि कॉल्स आदींचा अ‍ॅक्सेस ब्लॉक केला जाऊ शकतो. तसेच, डिव्हाइस वायरच्या मदतीने येणारा डेटा संग्रहित करू शकणार नाही.

iPhone 13 च्या अर्ध्या किमतीत मिळणार Nothing Phone 1; जाणून घ्या तपशील

गेल्या काही वर्षांपासून, अनेक कंपन्या डेटा सुरक्षेसंदर्भात बरेच काम करत आहेत, गुगलही त्यापैकी एक आहे, जी आपल्या अँड्रॉइड वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. गुगलने २०१७ मध्ये प्रगत संरक्षण सादर केले,तर मायक्रोसॉफ्ट त्याच्या एज ब्राउझरसाठी सुपर डुपर सुरक्षा मोडवर काम करत आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.