January 27, 2023
avatar feature on whatsapp

सर्वांचेच लाडके मेसेजिंग अ‍ॅप म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप आता आपल्या युजर्ससाठी एक नवे फीचर आणण्याच्या तयारीत आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर उपलब्ध असलेले हे फिचर आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवरही पाहायला मिळणार आहे. नुकतेच मेटाने आपले अवतार स्टोअर सादर केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपने हे पाऊल उचलले आहे. टेकरडारनुसार, अवतार फीचर प्रथम फेसबुक मेसेंजरवर आणि नंतर इन्स्टाग्रामवर आणले गेले.

व्हॉट्सअ‍ॅप बीटा इन्फो (डब्यूए बीटा इन्फो) या व्हॉट्अपसंदर्भात माहिती देणाऱ्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर लवकरच व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना व्हिडीओ कॉल दरम्यान ‘अवतारवर स्विच’ करण्याची परवानगी देईल. लवकरच अवतार एडिट सेक्शन मिळेल, जो कस्टमाइज केला जाऊ शकतो आणि चॅटमध्ये वापरला जाऊ शकतो. इन्स्टाग्रामनेही नुकतेच हे फीचर आपल्या अ‍ॅपमध्ये जोडले आहे. हे फीचर केवळ व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉइडपुरते मर्यादित नसून भविष्यात ते आयओएस वापरकर्त्यांसाठीही उपलब्ध होईल.

WhatsApp ने महिलांसाठी जारी केले ‘हे’ खास फीचर; आता सहजपणे ट्रॅक करता येणार मासिक पाळी

अवतार हे फीचर स्विच केल्यावर युजर्सना तुमच्या जागी तुमचा कार्टून अवतार पाहायला मिळेल. या प्रकारचे फिचर आयफोनमध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे. हे व्हर्च्युअल अवतार तुमच्या हावभावांप्रमाणे काम करते. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपवर अँड्रॉईड बीटा व्हर्जनसाठी हे फीचर देण्यात आले आहे.

याचप्रमाणे, व्हॉट्सअ‍ॅपवर नुकतेच एक नवीन फीचर उपलब्ध करून देण्यात आले आहे. खास महिलांच्या वापरासाठी तयार करण्यात आलेले हे फीचर आता वापरण्यासाठी तयार आहे. महिलांना त्यांच्या मासिक पाळीचा मागोवा घेण्यासाठी यापुढे कोणत्याही इतर अ‍ॅपची गरज भासणार नाही. कारण आता महिलांना व्हॉट्सअ‍ॅपवर त्यांच्या मासिक पाळीचा मागोवा घेता येणार आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.