
गायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय

गायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका
कोल्हापूर : गायरानातील अतिक्रमणे
काढण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णया विरोधात आमदार प्रकाश आवाडे यांनी राज्यातून पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ही अतिक्रमणे काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याला स्थगिती द्यावी, अशी मागणी आवाडे यांनी याचिकेत केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने ६ ऑक्टोबर २०२२ च्या आदेशानुसार आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत ही अतिक्रमणे काढण्याच्या सूचना राज्य शासनाला दिल्या होत्या. ही मुदत काढून टाकावी, गायरान व सरकारी जमिनीवर केलेल्या अतिक्रमणधारकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी, ज्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यांचे अतिक्रमण शासनातर्फे सर्वेक्षण करून नियमित करावे, अतिक्रमणधारकांच्या नावे त्याच गावामध्ये त्यांच्या नावे त्यांना राहण्यासाठी जमीन नाही अशा गरजू गरीब अतिक्रमणधारकांचे प्रशासनाने वेगळे सर्वेक्षण करावे, अशा मागण्या याचिकेतून करण्यात आल्या

गेली ३० वर्षे गावठाण हद्दवाढ आहे.झाली नसल्याने राज्यात सर्वत्र अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे तत्काळ गावठाण हद्दवाढ करण्यासाठी राज्य शासनास निर्देश देण्यात यावेत, अशीही आवाडे यांनी मागणी केली असून, पुढील आठवड्यात याची सुनावणी होणा आहे. एकीकडे राज्यातील साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुक जाहीर झाल्या असताना गायरानातील अतिक्रमणांचा मुद्दाही ऐरणीवर आल आहे. त्यामुळे आता आवाडे यांनी दाखल केलेल्या याचिकेच्य सुनावणीकडे सर्वाचे लक्ष लागून राहिल् आहे.