February 3, 2023
bride groom video

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असते. पण हे लग्न वधू किंवा वराच्या मनाविरुद्ध ठरवले गेले की लग्नामध्ये काहीतरी विपरीत घडण्याची शक्यता असते. विशेषतः हे लग्न वधूच्या संमतीशिवाय होत असेल तर ती लग्न सोडून पळून जाऊ नये, अशी शंका घरच्यांनाही असते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लग्न झाल्यावर नवरा नवरी स्टेजवर बसले असतानाच नवरीचा बॉयफ़्रेंड स्टेजवर येतो आणि तिच्या कपाळात सिंदूर भरतो आणि नंतर तिच्यासोबत पळून जातो. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया.

स्टेजवर येऊन नवरीच्या भांगेत भरला सिंदूर

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लग्नसोहळा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मंचावर वधू-वर बसले आहेत. वराचे वय खूप जास्त दिसतं आहे, तर वधूचे वय कमी आहे. वधू शांत बसली आहे. त्याच वेळी, वर त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या अनेक महिलांशी बोलण्यात व्यस्त आहे. यादरम्यान अशी काही घटना घडते ज्याने तुम्हीही बघतच राहाल.

( हे ही वाचा: दीड वर्षांपूर्वी केलेल्या मदतीची परतफेड करत त्याने दाखविला ‘प्रामाणिकपणा’; ‘ती’ २०१ रुपयांची पोस्ट होतेय Viral)

खरं तर, जेव्हा वर दुसऱ्या स्त्रीशी बोलण्यात व्यस्त असतो, तेव्हा स्टेजच्या मागून एक पुरुष वधूच्या दिशेने चालत येतो, जो वधूचा प्रियकर असल्याचे दिसते. त्या व्यक्तीच्या हातात सिंदूर घेतलेला दिसतो. तो वधूच्या खुर्चीच्या मागे उभा राहतो आणि मागून तिला सिंदूर लावू लागतो. पुरुष वधूचे कपाळ ५ वेळा सिंदूरने भरतो.

व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही अवाक व्हाल!

( हे ही वाचा: हत्तीला मारण्यासाठी वाघ धावला अन्… गजराजने अवघ्या ३० सेकंदात डावच पालटला; पाहा Viral Video)

धक्कादायक बाब म्हणजे यादरम्यान वर हे सर्व घडताना वराला काहीच माहीत नसते. व्हिडीओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता की वधूला सिंदूर लावल्यानंतर तो पुरुष तिचा हात धरून तिला त्याच्यासोबत चालण्याचा इशारा करतो. नववधूनेही त्याला हो बोलते आणि दोघेही स्टेजच्या मागून शांतपणे फरार होतात. हा व्हिडिओ पाहण्यास खूपच मजेशीर आहे. हे पाहिल्यानंतर यूजर्स वेडे होत आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर shitty.humours नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.