December 5, 2022
Fadnvis and Shinde new

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती पाटील यांचे काल(रविवार) निधन झाले. यामुळे आता चंद्रकांत पाटील यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या कोल्हापुरमधील निवासस्थानी नेते मंडळींची तसेच नागरिकांची रीघ लागली आहे. असे असताना आज(सोमवार) दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांचे सांत्वन करण्यासाठी येणार आहेत.

मुख्यमंत्री यांचा जिल्हा दौरा याप्रमाणे –

एकनाथ शिंदे यांचे दुपारी ३ वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन होणार. दुपारी ३.१५ वाजता आमदार चंद्रकांत पाटील यांच्या घरी सांत्वनपर भेट देणार आणि त्यानंतर दुपारी ४ वाजता ते विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण करतील.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक

उपमुख्यमंत्री यांचा जिल्हा दौरा –

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुपारी साडेतीन वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. दुपारी ४ वाजता आमदार चंद्रकांत पाटील यांच्या घरी सांत्वनपर भेट व राखीव. सायंकाळी साडेपाच वाजता विमानतळ येथून मुंबईकडे प्रयाण करतील.

याशिवाय आज सायंकाळी सात वाजता चार केंद्रीय मंत्री हे चंद्रकांत पाटील यांची संभाजीनगरमधील निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन करणार आहेत.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.