December 5, 2022
Manika Batra

गुरुवारी (२८ जुलै) इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतासाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. भारताची तारांकित टेबल टेनिसपटू मनिका बत्राने आपला सामना जिंकला आहे. मनिका बत्राने दक्षिण आफ्रिकेच्या मुशफिकुह कलामवर ११-५, ११-३, ११-२ असा विजय मिळवला. यासह भारताने दक्षिण आफ्रिकेवर २-० अशी आघाडी घेतली आहे.

भारतीय खेळाडू मनिका बत्राने पहिल्या गेममध्ये मुशफिकुह कलामचा ११-५ अशा फरकाने पराभव केला. पहिल्या गेममध्ये तिने प्रतिस्पर्धी खेळाडूवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. दुसऱ्या गेममध्येही मनिकाने कलामला एकही संधी दिली नाही. हा गेमही तिने एकतर्फी जिंकला. मनिकाच्या विजयी सुरुवातीमुळे भारतीय टेबल टेनिस संघाचा आत्मविश्वास वाढला आहे.

मनिका बत्राची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील कामगिरी चांगली आहे. आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेत तीने दोन सुवर्णांसह एकूण चार पदके जिंकलेली आहेत. याशिवाय तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरीतही कांस्यपदक पटकावलेले आहे. ऑलिंपिकच्या एकेरी स्पर्धेत तिसरी फेरी गाठणारी मनिका ही एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. मनिकाने टोकियो ऑलिंपिकमध्ये ही कामगिरी केली होती.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.