December 5, 2022
Achanta Sharath Kamal Gold Medal

बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या २२व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी घोडदौड सुरू आहे. भारताचा टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलने पुरुष एकेरीमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. अचंताने अंतिम सामन्यात इंग्लंडच्या लियाम पिचफोर्डचा ४-१ असा पराभव केला. अचंताचे या राष्ट्रकुल स्पर्धेतील हे चौथे पदक ठरले आहे.

४० वर्षीय अचंता शरथ कमलने यावर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत सुवर्ण आणि साथियान ज्ञानसेकरन सोबत पुरुष दुहेरीत रौप्यपदक पटकावले आहे. याशिवाय, श्रीजा अकुलासोबत त्याने मिश्र दुहेरीचेही सुवर्ण पदक पटकावलेले आहे.

यापूर्वी, २००६ मध्ये मेलबर्न राष्ट्रकुल स्पर्धेतील पुरुष एकेरीत त्याने सुवर्णपदक जिंकले होते. २०१० मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. आजच्या सनसनाटी सुवर्ण पदकामुळे त्याने आपल्यातील जिद्द संपली नसल्याचे सिद्ध केले.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.