November 27, 2022
Naveen Malik Gold Medal

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंची चमकदार कामगिरी सुरू आहे. शनिवारी (६ ऑगस्ट) नवीन मलिक या १९ वर्षीय भारतीय कुस्तीपटूने पुरुषांच्या ७४ किलो वजनी गटात सुवर्ण जिंकले. नवीनने पाकिस्तानच्या मुहम्मद शरीफ ताहिरचा पराभव करून राष्ट्रकुल स्पर्धेतील आपले पहिले पदक निश्चित केले. नवीनने ताहिरचा ९-१ अशा मोठ्या फरकाने पराभव केला.

रवी दहिया आणि विनेश फोगटनंतर नवीन मलिकने भारतासाठी कुस्तीतील सहावे सुवर्णपदक जिंकले आहे. यापूर्वी, शुक्रवारी (५ ऑगस्ट) बजरंग पुनिया(६५ किलो), दीपक पुनिया (८६ किलो) आणि साक्षी मलिक (६२ किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले होते. १९वर्षीय नवीन मलिकने पाकिस्तानच्या ताहिरचा पराभव करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

नवीनने सरुवातीपासून राष्ट्रकुल स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. नवीनचा पहिला प्रतिस्पर्धी नायजेरियाचा ओबोना इमॅन्युएल जोहान होता. नवीनने त्याला अवघ्या पाच मिनिटांत पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. उपांत्य पूर्व फेरीत त्याने सिंगापूरच्या हाँग येव लूचा एक मिनिट आणि दोन सेकंदात पराभूत केले होते. उपांत्य फेरीत देखील त्याने इंग्लंडच्या चार्ली बॉलिंगचा सहज पराभव केला होता.

हेही वाचा – CWG 2022: कुस्तीमध्ये सुवर्ण पदकांचा पाऊस! रवी कुमार दहिया अन् विनेश फोगटची ‘धाकड’ कामगिरी

२०२२ ‘सीनियर आशियाई चॅम्पियनशिप’मध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे नवीनला राष्ट्रकुल स्पर्धेची दारे खुली झाली होती. तिथे त्याने कांस्यपदक जिंकले होते. कोविड संसर्ग झाल्यामुळे त्याला ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. त्याची कसर त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत भरून काढली.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.