December 5, 2022
Neeraj Chopra


बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने ६१ पदकांसह चौथे स्थान मिळवले आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा स्पर्धेत सहभागी झाला असता तर ही पदक संख्या ६२ होऊ शकली असती. मात्र, दुखापतीमुळे नीरजला स्पर्धेतून ऐनवेळी माघार घ्यावी लागली होती. याचा फायदा पाकिस्तानच्या भालाफेकपटूला झाला. पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर नीरज चोप्राने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तानच्या अर्शद नदीमने आपल्या देशासाठी भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. अर्शदने ९१.१८ मीटर अंतरावर भालाफेकून भारताच्या नीरज चोप्राचा विक्रमही मोडला. सुवर्णपदक जिंकल्यानंतर अर्शद नदीमने सोशल मीडियावर पोस्ट केली. “अल्लाह आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत ९१.१८ मीटरसह भालाफेक करून सुवर्ण मिळवले,” असे कॅप्शन देऊन त्याने आपला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. अर्शदच्या पोस्टवर भारताच्या नीरज चोप्राने कमेंट केली आहे. “अभिनंदन अर्शद भाई. सुवर्णपदक आणि ९० मीटर अंतर पार करून विक्रम केला. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा,” अशी कमेंट नीरजने केली आहे.

नीरज चोप्राने अर्शद नदीमच्या पोस्टवर केलेली कमेंट (फोटो सोजन्य – इन्स्टाग्राम)

भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम यापूर्वी अंतिम फेरीमध्ये एकत्र खेळले आहेत. २०१८ मध्ये झालेल्या जकार्ता आशियाई खेळादरम्यान दोघांनीही पदके मिळवली होती. इतकेच नाहीतर त्यांनी व्यासपीठावर एकमेकांना शुभेच्छाही दिल्या होत्या. तेव्हा दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

हेही वाचा – CWG 2022: ४०वर्षीय अचंताचा राष्ट्रकुल स्पर्धेत ‘जलवा’; सुवर्ण पदक पटकावून केला शेवट गोड

दरम्यान, जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान नीरज चोप्रा दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत त्याला सहभागी होता आले नाही. या मोठ्या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर नीरज चोप्रा निराश झाला होता. त्याने चाहत्यांची माफीही मागितली.





Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.