February 2, 2023
गुपचुप वाचले जातायत तुमचे चॅट? मग Whatsaap ची ही सेटिंग आताच बंद करा


इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप हे प्रसिद्ध चॅटिंग अ‍ॅपपैकी एक आहे. जे आपल्याला जवळ-जवळ सर्वच लोकांच्या फोनमध्ये पाहायला मिळतं. व्हॉट्सअ‍ॅप कंपनीने काही दिवसांपूर्वी आपल्या सर्व वापरकर्त्यांसाठी मल्टी-डिव्हाइस समर्थन वैशिष्ट्य जारी केले आहे. या फीचरद्वारे तुम्ही तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते प्राथमिक फोनशिवाय इतर चार उपकरणांवर वापरू शकता. विशेष गोष्ट अशी आहे की, उर्वरित डिव्हाइसवर WhatsApp चालवण्यासाठी तुमच्या प्राथमिक डिव्हाइसमध्ये इंटरनेट सक्रिय असण्याची गरज नाही.
खरंतर व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्सला सुरुवातीला आपले व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट दुसऱ्या डिव्हइसवर चालवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप वेब हा पर्याय दिला होता. परंतु यासाठी मुळ व्हॉट्सअ‍ॅप डिव्हाइस असलेल्या फोनमध्ये इंटरनेट असणं गरजेचं होतं. परंतु आता असे होणार नाही.

आता व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फीचरनुसार मुळ फोनमध्ये इंटरनेट नसला तरी, तुम्ही ते दुसऱ्या डिव्हाइसमध्ये वापरु शकता. 

तथापि, आपल्याला एका गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागेल, ती म्हणजे त्याची लिंक डिव्हाइस सेटिंग. तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते अनेक ठिकाणी लॉग इन केले असल्यास, ते तुमच्या गोपनीयतेसाठी धोकादायक ठरू शकते. इतर कोणीही यापैकी कोणतेही उपकरण वापरत असल्यास, तुमचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट देखील वाचले जाऊ शकतात हे लक्षात ठेवा.

मल्टी-डिव्हाइस वैशिष्ट्य खाते दीर्घकाळ लॉग इन ठेवण्याची परवानगी देते. ही समस्या टाळण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अनलिंक डिव्हाईस फीचर उपलब्ध आहे. अशावेळी डिव्हाइस अनलिंक कसे करायचे ते जाणून घेऊ या-

लिंक डिव्हाइसेस लॉगआउट कसे करावे?

– तुमच्या Android किंवा iOS डिव्हाइसवर WhatsApp उघडा.
– आता व्हॉट्सअ‍ॅप मेनूवर टॅप करा (3 डॉट).
– येथे तुम्हाला Link Devices चा पर्याय दिसेल, त्यावर जा.
– येथे तुम्हाला त्या सर्व उपकरणांची यादी मिळेल, जिथे तुमचे WhatsApp खाते लॉग इन केले आहे.
– ज्या डिव्हाइसवरून तुम्हाला लॉगआउट करायचे आहे, त्यावर टॅप करा.
– आता लॉगआउट बटणावर टॅप करा.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.