February 2, 2023
England all-rounder Ben Stokes ODI Retirement

England All-rounder Ben Stokes Announces Retirement from ODIs : इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले. मंगळवारी (१९ जुलै) दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एकदिवसीय सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरणार आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक पत्र लिहून त्याने याबाबत घोषणा केली.

बेन स्टोक्स म्हणाला, “मी मंगळवारी डरहॅम येथे इंग्लंडसाठी माझा शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. मी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणे अत्यंत कठीण आहे. मला माझ्या सहकाऱ्यांसोबत इंग्लंडसाठी खेळतानाचा प्रत्येक मिनिट आवडतो. आम्ही आतापर्यंत अविश्वसनीय प्रवास केला आहे. हा निर्णय घेणे कठीण होते. मात्र, एकदिवसीय क्रिकेटमध्ये मी माझ्या संघसहकाऱ्यांना १०० टक्के योगदान देऊ शकत नाही. इंग्लंडची जर्सी घालणाऱ्या कोणत्याही खेळाडूकडून ही वाईट कामगिरीची अपेक्षा नसते.”

” क्रिकेटच्या तीन प्रकारांमध्ये मी आता टिकाव धरू शकत नाहीत. व्यस्त वेळापत्रक आणि आमच्याकडून असलेल्या अपेक्षांपुढे माझे शरीर मला साथ देत नाही. माझ्या जोस आणि इतर सहकाऱ्यांना नक्कीच एखादा चांगले योगदान देणारा खेळाडू मिळले. क्रिकेटपटू म्हणून प्रगती करण्याची आणि गेल्या ११ वर्षांत माझ्यासारख्या अनेक अविश्वसनीय आठवणी तयार करण्याची संधी दुसऱ्या कुणाला तरी देण्याची हीच योग्य वेळ आहे”, असेही स्टोक्स म्हणाला

“येथून पुढे माझ्याकडे जे काही आहे ते मी कसोटी आणि टी २० क्रिकेटसाठी देईन. मी कर्णधार जोस बटलर, प्रशिक्षक मॅथ्यू मॉट, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. गेल्या सात वर्षांत आम्ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली प्रगती केली आहे. इंग्लंडचे भविष्य उज्ज्वल दिसत आहे. मी आतापर्यंत खेळलेले सर्व १०४ एकदिवसीय सामने माझ्या आवडीचे आहेत. डरहॅममधील माझ्या घरच्या मैदानावर माझा शेवटचा सामना खेळताना मला चांगले वाटत आहे,” असे स्टोक्स पुढे म्हणाला.

हेही वाचा – IND vs ENG 3rd ODI : जाफरजी तुस्सी ग्रेट हो! बाजेवर झोपून उडवली ‘बेझबॉल’ची खिल्ली

पत्राचा शेवट करताना बेन स्टोक्स म्हणाला, “इंग्लंडचे चाहते नेहमीच मला पाठिंबा देत आले आहेत आणि यापुढेही देतील. तुम्ही जगातील सर्वोत्तम चाहते आहात. मला आशा आहे की आम्ही मंगळवारी (१९ जुलै) जिंकू आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेची चांगली सुरुवात करू.”

लॉर्ड्सवर २०१९च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात केलेल्या कामगिरीसाठी तो क्रिकेट चाहत्यांच्या कायम स्मरणात राहील. स्टोक्सच्या नाबाद ८४ धावांमुळे सामना सुपर ओव्हरमध्ये जाण्यास मदत झाली. अत्यंत रोमांचक परिस्थितीत इंग्लंडने आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.