December 1, 2022
गायिका फरमानी नाझ

युट्यूब वर लाखो स्बस्क्राइबर असलेल्या, इंडियन आयडल १२ मध्ये गोल्डन तिकीट मिळवणाऱ्या फरमानी नाझ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. श्रावण महिन्यात ‘हर हर शिव शंभू’ हे भजन गात, इस्लामचा अवमान केल्याचा आरोप फरमानी वर लावण्यात आला आहे. इस्लाम धर्मात गाण्यास परवानगी नाही विशेषतः मुस्लिम धर्मीय स्त्रियांनी गाणी गाऊ नये कारण हे धर्माच्या विरुद्ध आहे अशा शब्दात देवबंदी उलेमा व धर्मगुरूंनी फरमानीच्या व्हिडिओवर टीका केली आहे. इतकंच नव्हे तर फरमानीच्या विरुद्ध फतवा सुद्धा काढलेला आहे. या एकूण प्रकरणावर फरमानी व त्यांच्या आईने सुद्धा प्रतिक्रिया देत, आम्ही कलाकार आहोत, आमचा धर्म नसतो असे उत्तर दिले आहे.

फरमानी ने गाणे गाऊन इस्लाम धर्माचा व शरिया कायद्याचा अपमान केला आहे. नाच गाणे हे इस्लाम धर्मात हराम मानले जाते असे म्हणत देवबंदी उलेमा यांनी फतवा काढला होता. ज्याचे अनेक इस्लाम धर्मियांनी समर्थन केले मात्र सोशल मीडियावर फरमानी यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवला

फरमानी यांच्यावर झालेल्या टीकेनंतर त्यांनी देवबंदी व धर्मगुरूंना सुद्धा सवाल केले. “जेव्हा माझा पती मला सोडून गेला, जेव्हा त्याने मला सोडून दुसरे लग्न केले त्यावेळेस तुम्ही कुठे होतात, मी जो त्रास सहन केला, माझा पती माझ्यासमोर इतर मुलींशी बोलायचा मी विचारल्यावर मारहाण करायचा तेव्हा इस्लामची आठवण आली नाही का अशा प्रश्नातून फरमानी यांनी टीकाकारांचा समाचार घेतला.

फरमानी यांचा वादातीत व्हिडीओ हा त्यांच्या युट्युब पेजवर ट्रेंडिंग आहे. या व्हिडिओला आजवर ६ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कवाली ते भजन अशा विविध पद्धतीचे व्हिडीओ फरमानी यांच्या पेजवर आहेत. आजवर अनेकदा सोशल मीडियावर फरमानी यांची गाणी व्हायरल झाली होती,

फरमानी ‘हर-हर शंभू’ व्हिडीओ

फरमानी यांना इंडियन आयडल मध्ये आमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्यांच्या मुलाची तब्येत बिघडल्याने त्यांना शो अर्ध्यात सोडून जावे लागले होते. फरमानी यांच्या मुलाला गळ्याचा त्रास आहे आणि त्याची काळजी घेणे हे आपले पहिले प्राधान्य असल्याचे फरमानी सांगतात.

यापूर्वी सुद्धा अनेक इस्लाम धर्मीय अभिनेत्रींनीं अशाच प्रकारे मनोरंजन क्षेत्राला रामराम केला होता. २०१९ मध्ये दंगल फेम अभिनेत्री झायरा वसीम हिने सुद्धा आपण धार्मिक आयुष्याची सुरुवात करत असल्याने यापुढे चित्रपटात काम न करण्याचे घोषित केले होते. मात्र हे निर्णय प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर घ्यायला हवेत आणि फतवा काढून कलाकारांना धमकावणे हे गैर आहे अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.