December 5, 2022
realme-Narzo-30

Flipkart वर ६ जुलै ते १० जुलै दरम्यान पाच दिवस इलेक्ट्रॉनिक्स सेलचे आयोजन करण्यात आले आहे. या सेलमध्ये ई-कॉमर्स वेबसाइटवर बजेट, मिडरेंज आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर डिस्काउंट आणि बँक ऑफर्स दिल्या जात आहेत. या सेलमध्ये फीचर फोन सवलतीत खरेदी करता येतील. सेलमध्ये Apple, Poco, Asus ROG आणि Xiaomi-Redmi फोनवर सूट मिळण्याची संधी आहे.

Apple iPhone series
फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेलमध्ये आयफोन ११ फ्लिपकार्टवर ४७,९९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. सिटीबँक कार्डद्वारे, युजर्सना २ हजार रुपयांची सूट मिळू शकते. याशिवाय तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला १२,५०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

iPhone १२ स्मार्टफोन सेलमध्ये ५४,९९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. सिटीबँक कार्डद्वारे नॉन-ईएमआय ट्रांझेक्शनद्वारे १००० रूपयांची सूट मिळते. ईएमआय ट्रांझेक्शनवर १,२५० रुपयांची सूट असेल. याशिवाय जुने डिव्‍हाइस एक्सचेंज करण्‍यावर १२,५०० रुपयांपर्यंतची अतिरिक्त सवलतही मिळेल.

आणखी वाचा : Digilocker: तुम्हाला हवं तेव्हा मोबाईल नंबर अपडेट करा, फॉलो करा या स्टेप्स

Poco phones
फ्लिपकार्टवर अनेक पोको फोन कमी किमतीत सेलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सेलमध्ये Poco X4 Pro 5G स्मार्टफोन १६,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. Poco M4 5G आणि Poco M4 Pro 4G व्हेरिएंट ११,९९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकतात. तसंच Poco M4 Pro चा 5G व्हेरिएंट १२,९९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. Poco F3 GT गेमिंग फोनचे ६ आणि ८ GB रॅम व्हेरिएंट २६,९९९ रुपयांना सेलमध्ये घेतले जाऊ शकतात.

Realme phones
Realme Narzo 30 स्मार्टफोन १४,४९९ रुपयांना आणि Realme 9 १७,९९९ रुपयांना सेलमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसंच ७,४९९ रुपयांमध्ये Realme C20 आणि १०,९९९ रूपयांमध्ये Realme C25Y खरेदी करण्याची संधी आहे.

आणखी वाचा : Airtel vs Reliance Jio: २०० रुपयांपेक्षा कमी किमतीत अनलिमिटेड कॉल, फ्री ऑफर्स, पाहा कोण देतंय स्वस्तात बेनिफिट्स?

Xiaomi and Redmi phones
Redmi Note 10T स्मार्टफोन १३,९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर Redmi Note 10S १२,९९९ रूपयांमध्ये खरेदी करता येईल. सेलमध्ये Xiaomi 11i हायपरचार्जची किंमत २६,९९९ रुपये आहे आणि तुम्ही ICICI बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास तुम्हाला २००० रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.

याशिवाय मोटोरोला एज 20 प्रो फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेलमध्ये ३२,९९९ रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. सिटीबँक कार्डसह फोनवर १,००० रूपयांची सूट मिळते. तसंच २४,९९९ रुपयांमध्ये Motorola Edge 20 खरेदी करण्याची संधी आहे. हा फोन सिटीबँक कार्डद्वारे खरेदी केल्यास त्यावर १००० रुपयांची सूट देखील मिळेल.

तसंच Asus Rog Phone 5 स्मार्टफोन सेलमध्ये ४९,९९९ रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही सिटीबँक कार्डद्वारे फोन घेतल्यास तुम्हाला १००० रुपयांची सूट मिळेल. Asus 8Z ४२,९९९ रूपयांमध्ये मिळू शकते आणि Citibank कार्डद्वारे १००० रूपयांची सूट मिळेल.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.