January 28, 2023
Google-Pixel-7-Pixel-7-Pro

अलिकडेच गुगलने पिक्सेल ७ आणि पिक्सेल प्रो हे दमदार फीचर असलेले स्मार्टफोन बाजारात लाँच केले. या फोनची ग्राहकांमध्ये इतकी मागणी होती की, तो फ्लिपकार्टवर येताच काही तासांतच आउट ऑफ स्टॉक झाला होता. मात्र, हा फोन आता मोठी समस्या देत असल्याचे समोर आले आहे. फोनची बॅटरी लवकर संपत असल्याची तक्रार होत असल्याचे काही अहवालांतून समोर येत आहे.

बॅटरी संपण्यामागे हे आहे कारण

एक्सडीए डेव्हलपर्सनुसार, फोनची चाचणी केली असता, ब्राइटनेस वाढवली असता डिस्प्ले भरपूर उर्जा वापरत असल्याचे दिसून आले. गिझमो चायनानुसार, १५ मिनिटांच्या स्क्रिन टाईम नंतर बॅटरी १० टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले. अहवालानुसार, ६०० एनआयटीएसवर google pixel 7 pro ३.५ ते ४ वॉट इतकी उर्जा घेतो, पण १ हजार ५०० एनआयटीएसच्या ब्रायटनेसवर फोन ६ वॉट उर्जा घेत असल्याने बॅटरी लवकर संपत असल्याचे अहवालातून सांगण्यात आले आहे.

(आता लाईनमध्ये लागण्याची गरज नाही, ‘या’ नव्या प्रणालीने सहज मिळेल रेल्वेचे अनारक्षित तिकीट)

१ हजार एनआयटीएसच्या ब्रायटनेसमध्ये सॅमसंग गॅलक्सी एस २२ अल्ट्रा फोन हा ४ वॉट उर्जा वापरतो, तर पिक्सेल प्रो ६ हा ८०० एनआयटीएसवर ४ वॉट उर्जा वापरतो, यातून समस्या केवळ पिक्सेल ७ प्रो मध्ये असल्याचे अहवालातून सांगण्यात आले आहे.

तर बॅटरीची बचत होऊ शकते

अहवालानुसार, घरात कमी ब्राइटनेसमध्ये फोन वापरल्याने बॅटरी लवकर संपणार नाही, मात्र दीर्घकाळ उच्च ब्राइटनेसमध्ये फोन वापरल्यास ही बॅटरी संपण्याची समस्या जाणवू शकते, असे अहवालात सांगण्यात आले आहे.

(ट्रम्प यांच्या ‘ट्रुथ अ‍ॅप’ला गुगलचा हिरवा कंदील, ट्विटरला देईल आव्हान, काय आहे हे अ‍ॅप? जाणून घ्या)

दरम्यान, ही सॉफ्टवेअरची समस्या असल्यास गुगल अपडेटद्वारे ही समस्या सहज सोडवू शकतो. पण फोनच्या हार्डवेअरमध्ये समस्या असल्यास पॅनलला अधिक कार्यक्षम करणे शक्य होणार नाही, असेही अहवालातून आणि आयएनएनच्या माहितीतून समजले आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.