November 27, 2022
Google-Street-View-India

अनोळखी प्रदेशात एखाद्या ठिकाणाचा शोध घ्यायचा असेल तर गुगुल मॅपचा सर्रास वापर केला जातो. गुगलने आपल्या फिचरला वेळोवेळी अपडेट केले आहे. मात्र गुगला आता Google Street View नावाचे नवे फीचर लॉन्च केले आहे. या फिचरच्या मदतीने वापरकर्त्यांना एखादे ठिकाणी ३६० अशांत पहता येणार आहे. तांत्रिक भाषेत या सुविधेला 360-डिग्री इंटरॅक्टिव्ह पॅनोरमा फीचर म्हटले जात आहे. गुगलचे हे नवे फिचर सध्या देशातील दहा शहरात लॉन्च करण्यात आले आहे. या फीचरसाठी गुगलने स्थानिक कंपनी टेक महिंद्रा आणि मुंबई येथील जेनेसिस इंटरनॅशनल या कंपन्यांसोबत भागिदारी केली.

हेही वाचा >> न्यूड फोटोशूटनंतर रणवीर सिंगची पहिली पोस्ट चर्चेत, सिद्धार्थ जाधव म्हणाला…

मिळालेल्या माहितीनुसार गुगलने 360-डिग्री इंटरएक्टिव्ह पॅनोरमा फीचर लॉन्च केले आहे. या हे फीचर सध्या देशातील फक्त दहा शहारंमध्ये राबवले जात आहे. आगामी दोन वर्षांत सात लाख किमी, ५० शहरांचे मॅपिंग करुन या शहरांत हे फीचर लागू केले जाईल. केंद्र सरकारच्या बदललेल्या National Geospatial Policy २०२१ धोरणामुळे गुगलला हे शक्य झाले आहे.

हेही वाचा >> वाघाची डरकाळी, रिक्षाचा हॉर्न अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संबंध काय? दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात…

गुगल मॅपच्या उपाध्यक्षा Miriam Karthika Daniel यांनी गुगलच्या या नव्या फिचरबद्दल अधिक माहिती दिली आहे. “गुगलने ज्यांच्यासोबत भागिदारी केली आहे, अशा कंपन्यांकडे चांगला अनुभव आहे. तसेच त्यांच्याकडे मूलभूत भौगोलिक तंत्रज्ञान आहे. या संस्थांनी स्थानिक डेटा गोळा करणे गरजेचे आहे. सरकारी कार्यालये, संरक्षण आणि लष्करी क्षेत्राचे मॅपिंग केले जाणार नाही. कोणत्या भागाचे मॅपिंग करावे आणि कोणत्या नाही याबाबतची कल्पना आमच्या भागिदारांना आहे,” असे डॅनियल यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >> श्रेयस तळपदे साकारणार अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका, पोस्टर पाहिलंत का?

दरम्यान, गुगलने २०११ साली स्ट्रीट व्ह्यू मॅपिंग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बंगळुरु पोलिसांनी यावर आक्षेप घातला होता. त्यानंतर Wonobo and later MapMyIndia या संस्थांनी मॅपिंगवर काम करण्यास सुरुवात केली होती.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.