February 1, 2023
Guinness world record officially gave monday the worst day of the week

Guinness Book Of World Records: आपल्याकडे अनेकदा कोणतेही महत्वाचे काम करण्याआधी दिवस पाहिला जातो. तो दिवस बघूनच महत्वाचे काम केले जाते. विशेषतः भारतातील लोक दिवस पाहून कोणतेही काम सुरू करतात. पण अलीकडेच जगातील सर्वात मोठ्या रेकॉर्ड बुकमध्ये आठवड्यातील अशा एका दिवसाची नोंद करण्यात आली आहे जो सर्वात वाईट दिवस आहे.

‘सोमवार’ ठरला सर्वात वाईट दिवस

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सोमवारीच ट्वीट करून लोकांना आश्चर्यचकित केले आणि आठवड्यातील सर्वात वाईट दिवस कोणता आहे हे सांगितले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “आम्ही अधिकृतपणे सोमवारला आठवड्यातील सर्वात वाईट दिवसाचा रेकॉर्ड देत आहोत.” या ट्वीटनंतर सर्व लोक विचारात पडले की सोमवारच का?

( हे ही वाचा: Video: भीषण हल्ल्यातून काळवीटाचा मृत्यूला चकवा! सिंहीणीच्या जबड्यात अडकले डोके, पाहा सुटकेचा थरार)

गिनीज बुकने असे का म्हटले?

वास्तविक सोमवार हा शनिवार आणि रविवार नंतर येतो, म्हणजे दोन सुट्ट्यांनंतर येतो. या दिवशी लोकांना ऑफिस किंवा इतर कामाच्या ठिकाणी जाण्यास आळस जाणवतो. इतकेच नाही तर अनेक वेळा सोशल मीडियावर लोक लिहितात की सोमवार हा सर्वात वाईट दिवस आहे. हे लक्षात घेऊन गिनीज बुकने सोमवार हा दिवस वाईट दिवस म्हणून घोषीत केला.

( हे ही वाचा: Video: तब्बल ९ तासांच्या मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाने वाजवला सेक्सोफोन; प्रतिक्रिया देत म्हणाला, “यामुळे मला खूप…”)

लोकांनी दिल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया

या ट्वीटनंतर जगभरातील ट्विटर यूजर्स त्यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक असे म्हणत आहेत की गिनीज बुकने एकदम अचूक दिवस सांगितला आहे. खरं तर गिनीज बुकने हे ट्वीट केवळ गमतीसाठी केले आहे आणि लोक त्यास सहमत असल्याचे दिसत आहेत.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.