December 5, 2022
Virat Kohli Fans

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला एकदिवसीय आणि टी २०, अशा दोन मालिका खेळायच्या आहेत. मात्र, या दौऱ्यासाठी निवडलेल्या दोन्ही संघांमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा समावेश नाही. असे असले तरी विराटच्या चाहत्यांना त्याचा अजिबात विसर पडलेला नाही. क्वीन्स पार्क ओव्हलवर सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात याची प्रचिती आली. सामन्यादरम्यान चाहत्यांच्या एका गटाने विराट कोहलीसाठी पोस्टर फडकवले.

विराट कोहली सध्या अतिशय वाईट फॉर्मशी झगडत आहे. कधी काळी धावांचा पाऊस पाडणारा विराट गेल्या तीन वर्षांच्या काळामध्ये एकही शतक करू शकलेला नाही. त्यामुळे त्याच्यावर अनेकांनी टीकाही सुरू केली आहे. अशातच वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेलेल्या संघात त्याचा समावेश झालेला नाही. विराट कोहलीने स्वत: विश्रांती मागितल्याचे काहींचे म्हणणे आहे. तर, त्याला जाणीवपूर्वक संघातून वगळल्याचेही काहींचे म्हणणे आहे. मात्र, विराट कोहलीचे चाहते या कठीण काळातही त्याच्यावर विश्वास ठेवून आहेत.

पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर विराट कोहलीच्या काही चाहत्यांनी त्याच्यासाठी पोस्टर फडकवले. ‘आम्हाला तुझी आठवण येत आहे’, ‘वन्स अ किंग, ऑल्वेज अ किंग’, असा मजकूर या पोस्टरवरती लिहिलेला होता. या पोस्टरच्या माध्यमातून चाहत्यांनी विराट कोहलीवरील आपला विश्वास कायम असल्याचे दाखवले आहे.

हेही वाचा – अभिमानास्पद! इंग्लंडमधील क्रिकेट मैदानाला देण्यात आले भारतीय खेळाडूचे नाव

दरम्यान, क्रिकेटपासून दूर असलेला विराट कोहली सध्या पॅरिसमध्ये आहे. पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकासोबत वेळ घालवत आहे. या सुट्टीनंतर तो जोरदार पुनरागमन करेल, अशी चाहत्यांना आशा आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.