December 5, 2022
Rain of offers on iPhone13

iPhone 13 Price Cut: आयफोन १४ सप्टेंबर महिन्यात लाँच होणार आहे. पण त्याआधी आयफोन १३ वर फास्ट डिस्काउंट दिले जात आहेत. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून आयफोन १३ अतिशय स्वस्तात खरेदी करता येईल. जर तुम्ही नवीन आयफोन घेण्याचा विचार करत असाल आणि बजेट थोडे कमी असेल तर हीच तुमच्यासाठी योग्य संधी आहे. आयफोन १४ लाँच होण्यापूर्वी आयफोन १३ च्या किमतीत मोठी कपात करण्यात आल्याने आयफोन प्रेमी खूश झाले आहेत. चला जाणून घेऊया आयफोन १३ वरील सूट आणि ऑफर्स…

iPhone 13 ऑफर आणि सवलत

आयफोन १३ (१२८जीबी) ची लॉन्चिंग किंमत ७९,९०० रुपये आहे परंतु सध्या मिळत असलेल्या ऑफरमुळे आयफोन १३ फ्लिपकार्टवर ७३,९०९ रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच फोनवर ५९९१ रुपयांची सूट दिली जात आहे. त्यानंतर अनेक बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील आहेत, ज्यामुळे फोनची किंमत लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.

( हे ही वाचा: २८,००० रुपयांच्या सवलतीसह मिळतोय iPhone 12 5G; जाणून घ्या संपूर्ण ऑफर)

iPhone 13 बँक ऑफर

आयफोन १३ खरेदी करण्यासाठी तुम्ही HDFC डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला १ हजार रुपयांची सूट मिळेल. त्यानंतर फोनची किंमत ६९,९०९ रुपये एवढी असेल. त्यानंतर एक्सचेंज ऑफर देखील आहे. यामुळे अजून आयफोन १३ च्या किंमतीत सूट मिळू शकते.

आयफोन 13 एक्सचेंज ऑफर

आयफोन १३ वर १९ हजार रुपयांची मोठी एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला खूप मोठी सूट मिळू शकते. परंतु जुन्या फोनची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीनतम असेल तरच तुम्हाला १९ हजार रुपयांची सूट मिळेल. जर तुम्ही फुल ऑफ मिळू शकलात, तर फोनची किंमत ५०,९०९ रुपये असेल. म्हणजेच आयफोन १३ च्या लाँचिंग किंमतपेक्षा जवळपास ३०,००० रुपयांपर्यंत घवघवीत सूट मिळण्याची संधी उपलब्ध आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.