December 1, 2022
Reliance-Jio-Best-Recharge-Plans

रिलायन्स जिओने नुकतीच माहिती दिली आहे की, 5G नेटवर्क लवकरच देशभरात आणला जाणार आहे. जिओने देशात सगळ्या आधी 4G नेटवर्क परवडणाऱ्या किमतीत आणून धुमाकूळ घातला होता. मुकेश अंबानी यांच्या मालकीची ही दूरसंचार कंपनी देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटरपैकी एक आहे. जिओकडे अनेक किंमतीच्या रेंजमध्ये प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स आहेत. Reliance Jio कडे १ GB, २ GB, २.५ GB, ३ GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल्ससह कॉम्बो प्लॅन आहेत. आम्‍ही तुम्‍हाला दररोज ३ जीबी डेटासह जिओ रिचार्ज प्रीपेड प्‍लॅनबद्दल सांगणार आहोत, जिची किंमत ४१९ रुपयांपासून सुरू होते.

४१९ रुपयांचा जिओ प्रीपेड प्लॅन
जिओच्या ४१९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता २८ दिवसांची आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहक एकूण ८४ जीबी डेटाचा लाभ घेऊ शकतात. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. जिओचा हा रिचार्ज पॅक अनलिमिटेड व्हॉइस कॉलच्या सुविधेसह येतो. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस देखील दिले जातात.

Jio च्या या रिचार्ज पॅकमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud उपलब्ध आहेत.

आणखी वाचा : ६ तासांपर्यंतची बॅटरी लाइफ देणारा Mivi Fort S16, S24 साउंडबार भारतात लॉंच, किंमत १,२९९ रूपयांपासून सुरू

६०१ रुपयांचा जिओ प्रीपेड प्लॅन
Jio च्या ६०१ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा व्यतिरिक्त ६ जीबी अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. म्हणजेच या रिचार्ज पॅकमध्ये ग्राहकांना एकूण ९० जीबी डेटा ऑफर करण्यात आला आहे. दररोज प्राप्त डेटा खर्च केल्यानंतर, इंटरनेटचा वेग ६४Kbps पर्यंत घसरतो. जिओ युजर्सना प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस (स्थानिक, एसटीडी, रोमिंग) कॉल सुविधा मिळते. या प्रीपेड पॅकमध्ये दररोज १०० एसएमएस देखील दिले जातात.

याशिवाय जिओच्या या प्लॅनमध्ये Disney + Hotstar, JioTV, JioCinema, JioSecurity आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन मोफत आहे. Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन कंपनी १ वर्षासाठी ऑफर करते.

आणखी वाचा : वर्षभरासाठी रिचार्जची चिंता सोडा! एअरटेलच्या प्लॅनमध्ये ७३० GB डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि फ्री ऑफर्स

जिओचा १,१९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन
रिलायन्स जिओच्या १,१९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटानुसार एकूण २५२ जीबी डेटा दिला जातो. दैनंदिन डेटा संपल्यानंतर, वेग ६४Kbps पर्यंत घसरतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉल्सची ऑफर दिली जाते.

Jio चा हा रिचार्ज पॅक JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud मोफत देतो.

४,१९९ रुपयांचा जिओ प्रीपेड पॅक
रिलायन्स जिओच्या ४१९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता ३६५ दिवसांची आहे. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर पुन्हा पुन्हा रिचार्ज करावे लागणार नाही. या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच, कंपनी ग्राहकांना एकूण १०९५ जीबी डेटा ऑफर करते. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. या प्रीपेड प्लॅनमध्ये अनमिलिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्सची सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस मोफत दिले जातात.

Jio च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये Disney + Hotstar मेंबरशिप १ वर्षासाठी मोफत आहे. याशिवाय Jio च्या या प्लानमध्ये Jio TV, JioCinema, Jio Security आणि Jio Cloud ची सुविधा देखील मोफत उपलब्ध आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.