December 5, 2022
Reliance-Jio-6

तुम्ही एखादी छान सिरीज बघत असता, किंवा मोबाईलचा हॉटस्पॉट वापरून ऑफिसचं काम करत असता आणि अशावेळी अचानक तुम्ही १००% इंटरनेट डेटा वापरल्याचा मॅसेज नोटिफिकेशन मध्ये येतो…सगळं काम तिथेच अडून पडतं. पण यापुढे असं घडलं तरी चिंता करण्याची गरज नाही. जर का आपण रिलायन्स जिओचे नेटवर्क वापरत असाल तर तुम्हाला अगदी कमी दरात छोट्या रिचार्ज पॅकच्या मदतीने डेटा ऍड ऑन विकत घेता येईल. रिलायन्सचे असे ऍड ऑन प्लॅन्स १५० रुपयांहून कमी खर्चात उपलब्ध आहेत. या रिचार्ज नंतर आपण कोणत्याही अडथळ्याशिवाय इंटरनेट वापरू शकाल. अशा काही रिचार्ज प्लॅन्सची माहिती आपण पाहणार आहोत..

जर का तुमचा डेटा प्लॅन रोजच वेळेच्या आधी संपत असेल तर आपण आपल्या मोबाईलच्या ऍप सेटिंग तपासून पहा. अनेक ऍप अधिक इंटरनेट वापरतात जर का आपण ते वापरत नसाल आणि तरीही ते चालू असतील तर ते लगेच बंद करा व फोनची मेमरी क्लिअर करा. याशिवाय आपण मोबाईल मध्ये डेटा वापराची मर्यादा सुद्धा सेट करू शकता.

आता आईच सांगेल मोबाईल वापर.. ‘या’ नव्या अभ्यासात समोर आलाय भन्नाट Result, जाणून घ्या

JIO @१५ रुपयांचा डेटा प्लॅन

हा प्लॅन मर्यादित गरजेसाठी उत्तम आहे. अवघ्या १५ रुपयांच्या रिचार्ज मध्ये आपण १ जीबी डेटा मिळवू शकता. तुमच्या रिचार्ज प्लॅनच्या वैधतेच्या तारखेपर्यंत या ऍड ऑन प्लॅनची वैधता असते.

JIO @२५ रुपयांचा डेटा प्लॅन

या रिचार्ज प्लॅन मध्ये तुम्हाला एकूण २ जीबी डेटा मिळेल.या प्लॅनची वैधता तुमच्या सुरु रिचार्ज प्लॅनच्या वैधतेच्या तारखेपर्यंत असेल.

JIO @६१ रुपयांचा डेटा प्लॅन

जिओच्या या ६१ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण ६ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता तुमच्या चालू रिचार्ज प्लॅनच्या वैधतेच्या तारखेपर्यंत असेल.

JIO @१२१ रुपयांचा डेटा प्लॅन

जर तुम्हाला कामासाठी अधिक डेटाची आवश्यकता असेल तर आपण १२१ रुपयांचा मिनी रिचार्ज करू शकता, यात आपल्याला १२ जीबी डेटा उपलब्ध होतो. या प्लॅनची वैधता सुद्धा तुमच्या सुरु डेटा प्लॅनच्या वैधतेपर्यंत असते.

दरम्यान रिलायन्स जिओ सध्या भारतात 5G नेटवर्क आणण्याच्या तयारीत आहे. येत्या १५ ऑगस्टला आझादीचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी भारतभर 5G नेटवर्क लाँच करणार असल्याची माहिती एका कार्यक्रमात रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिली होती.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.