February 2, 2023
KL Rahul NCA Practice video

KL Rahul NCA Practice : भारतीय पुरुष क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी काही दिवसांपूर्वी भारतीय संघाची निवड करण्यात आली. त्यामध्ये केएल राहुलच्या नावाचा समावेश करण्यात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण, केएल राहुलवर दोन आठवड्यांपूर्वीच जर्मनीमध्ये शस्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे तो लगेच मैदानावर कसा येणार? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. या प्रश्नाचे उत्तर देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो भारताची घातक महिला गोलंदाज झुलन गोस्वीमाचा सामना करताना दिसत आहे. दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडिायवर व्हायरल झाला आहे.

शस्रक्रिया झाल्यानंतर काही दिवसांतच केएल राहुल मैदानावर उतरला आहे. सध्या तो बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत आहे. या व्हिडीओमध्ये तो पायांना पॅड बांधून फलंदाजीचा सराव करताना दिसला. सरावादरम्यान त्याने भारताची दिग्गज महिला गोलंदाज झुलन गोस्वामीची मदत घेतली आहे. झुलन एकामागून एक अप्रतिम चेंडू फेकताना दिसत आहे. ज्यावर राहुल कधी बचावात्मक तर कधी कव्हर शॉट मारण्याचा प्रयत्न करताना दिसतो. गोस्वामी झुलन आणि केएल राहुल यांना एकत्र सराव करताना बघून चाहत्यांना आश्चर्य वाटले आहे.

दोघांचा सराव करतानाचा व्हिडीओ समोर आल्याने वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी राहुल तंदुरुस्त होण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. केएल राहुल वेस्ट इंडीजमध्ये भारतीय संघासाठी टी २० मालिका खेळणार आहे. त्यापूर्वी तो एकदम तंदुरुस्त झाला तर भारतीय संघासाठी फायद्याचे ठरणार आहे.

हेही वाचा – Rishabh Pant : युवराज सिंगच्या ‘त्या’ ट्वीटला ऋषभ पंतने मोजक्या शब्दांत दिले उत्तर, म्हणाला…

दरम्यान, झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये ती कधीपर्यंत खेळणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. ती भारताची सर्वात यशस्वी आणि अनुभवी गोलंदाज आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.