February 4, 2023
विमा हप्ता भरण्यासाठी मिळणार कर्ज!

विमा हप्ता भरण्यासाठी मिळणार कर्ज!

विमा हप्ता भरण्यासाठी मिळणार कर्ज!

जीवन बिमा, आरोग्य विमा, वाहन विमा किंवा प्रवास विमा”यासह कोणताही विमा असो, ती योजना कर्जावर मिळतनाही. एवढेच नाही, तर थर्ड पार्टीकडून हप्ता भरला तरी त्यापोटी मिळणारी’सबलत ही ग्राहकाला विमा कंपनीकडून दिली जात नाही. कारण विम्याचाहप्ता हा अन्य व्यक्‍तीच्या क्रेडिट कार्डने, धनादेशाद्वारे भरता येत नाही’किंबा मान्य केला जात नाही. विम्याचा हप्ता हा योजनेच्या स्वरूपानुसारनिश्‍चित केलेले असते. प्लॅटिनम, गोल्ड, सिल्वर या प्रकारच्या विविधश्रेणी असतात आणि त्यानुसार हप्ता भरावा लागतो. विमा योजनेचेअसंख्य फायदे आहेत आणि त्याचे महत्त्व ओळखून असंख्य नागरिकविमा उतरविण्याबाबतही सजग असतात. विमा व्यवसाय सध्या वेगानेविकसित होत असला, तरीही समाजातील निम्न उत्पन्न गटातील किंवागरीब गटातील लोकांत विमा घेण्याबाबत उदासीनता दिसते. उत्पन्नाचाखोत कमी असल्यानेच अनेकांना विम्याचा हप्ता भरणे शक्‍य होत नाही.

UPI payments can be made even without internet

सर्वांपर्यंत विमा पोहोचेल

विम्याचा लाभ हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावा यासाठीसरकारकडून प्रयत्न केले जातात. विमा नियामक संस्था ‘इर्ड’देखीलसरकारच्या धोरणानुसार काम करते आणि उपाययोजना आखते. गरीबआणि सामान्य लोकांना विमा हप्त्याचा बोजा सहन करता यावा आणिगरजा भागाव्यात, अशा प्रकारच्या योजना आणण्यासाठी ‘ईर्डा’ संस्थादक्ष असते. या श्रेणीत ‘इर्डा’ने एक नवीन योजना आणली असून, यानुसारएखादी व्यक्‍ती विमा योजना खरेदीची इच्छा बाळगून आहे. परंतु हप्ताभरता येत नसल्याने आपला विचार बदलत असेल, तर अशा मंडळींसाठीही योजना फायदेशीर आहे. ‘इर्डा’ची नवीन योजना अमलात येत असेल,तर मग संबंधित व्यक्‍ती कितीही गरीब असली तरी त्याच्याकडे किमानएक जीवन विमा पॉलिसी राहील. याबाबत ‘इर्डा’कडून होणार्‍या तयारीचेआकलन करू या.

विमा हप्ता भरण्यासाठी मिळेल कर्ज

‘इर्डा’ संस्था अशा एका योजनेवर काम करत असून, त्यानुसारएखादा व्यक्ती विमा पॉलिसी खरेदी करण्याचा विचार करत असेल; परंतुत्याकडे हप्ता भरण्यासाठी पैसे नसतील तरीही तो या योजनेंतगत विमापॉलिसी खरेदी करू शकतो. हप्ता भरण्यासाठी लोकांना कर्ज देण्याचीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या नियोजनावर ‘इर्डा’ संस्था काम करतआहे. या माध्यामतून हप्ता भरण्याची सुविधा प्रदान करून पॉलिसी सक्रियठेवण्यासाठी ‘इर्डा’ मदत करेल. तसेच पॉलिसी मुदतपूर्वच बंद होण्यापासूनवाचविणे आणि गरजूंना विम्याचा लाभ पोहोचवणे, यासाठी ही योजनाआणली जात आहे. गरीब घटकांतील लोकांनादेखील बिमा योजनेचालाभ मिळावा, हा यामागचा हेतू आहे. अमेरिका आणि युरोपचा विचारकेल्यास तेथे विमा बाजार बर्‍याच अंशी व्यापक आहे. भारतारसारख्याबिकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेत कमी उत्पन्न गटातील लोकांची संख्याअधिक असल्याने विम्याची व्यापकता कमी आहे. त्यामुळेच ‘र्डा’कडूनअशा प्रकारचा बदल केला जात आहे.

विम्याला अन्य कोणताही पर्याय नाही.

अनिश्‍्चिततेच्या वातावरणापासून कुटुंबाला, स्वत:ला सुरक्षिततामिळवण्यासाठी आणि भविष्य सुकर ठेवण्यासाठी विमा योजना असणेगरजेचे आहे. एवढेच नाही, तर दुर्दैवी घटनेत वारसदारांना किंवा अवलंबूनअसणार्‍या सदस्यांना आर्थिक आधार देण्याचे काम विमा योजना करतात.एखादा व्यक्‍ती अचानक आजारी पडत असेल, तर त्यावेळी विमा योजना हमदत करते. आपल्याकडे योग्य जीवन विमा, टर्म इन्श्युरन्स, आरोग्यविमा पॉलिसी असेल तर भविष्यातील तणावातून मुक्‍त राहू शकतो. विमायोजना मोलाची असूनही काही जण विमा योजना खरेदी करू शकतनाही. कारण त्यांच्याकडे हप्ता भरण्यासाठी पैसे नसतात. विमा नियामक“र्डा’च्या प्रयत्नातून आता ही समस्या लवकरच निकाली निघण्याचीआशा आहे.

कर्जाच्या आधारे हप्ता भरण्याचे फायदेही

 व्यवस्था लागू झाल्याने विमा नूतनीकरण न करण्याचे प्रमाणकमी होईल. त्याचबरोबर जी मंडळी विमा योजनेपासून वंचित आहेत,त्यांनादेखील बिमा योजना घेता येणार आहे. कारण त्यांना नवीन’नियमांनुसार विमा पॉलिसी खरेदी करणे सहज शक्‍य राहू शकते. तसेचविमा योजना लॅप्स होण्याचे प्रमाण कमी राहील. विमा सुरू राहिल्यानेग्राहकांना योजनेचा लाभ कायम राहू शकतो आणि दावे निकालीकाढण्यात अडचणीदेखील येणार नाहीत. कर्जाच्या सुविधेतून कमीबयोगटातील ग्राहकदेखील बिमा योजना सक्रिय ठेवू शकतील.७ रिटेल आणि कॉर्पोरेट या दोन्ही प्रकारच्या प्रस्तावकांनाहप्त्यासाठी फायनान्सची सुविधा मिळू शकते. दोन्ही प्रकारचे ग्राहकहप्ता भरण्यासाठी कर्ज घेऊ शकतील आणि कालांतराने ते परतफेड करूशकतील. त्यामुळे संबंधितावर एकाचबेळी मोठा हप्ता भरण्याचा बोजापडणार नाही.

विमा हप्ता भरण्यासाठी मिळणार कर्ज!
विमा हप्ता भरण्यासाठी मिळणार कर्ज!

कशी असेल योजना?

या महत्त्वाकांक्षी योजनेतून लोकांना विम्याचा एकरकमी हप्ताभरण्यासाठी कर्ज मिळेल आणि ते कर्ज कालांतराने मासिक आधारावरफेडता येणार आहे. या व्यवस्थेतून देशात विमा योजनेचा विस्तार होईलआणि विम्याबाहेर असलेले नागरिक विमा कवचाखाली येतील.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.