December 1, 2022
gmail unwanted mails tips tricks

जीमेल हा एक अतिशय लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. कोणत्याही अ‍ॅपमध्ये प्रवेश करण्यासाठी, आपल्याला त्यात आपला ईमेल आयडी प्रविष्ट करावा लागतो. आता बहुतेक लोक जीमेल वापरतात त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे मेल येणे साहजिक आहे. वर्क मेल्स व्यतिरिक्त, स्पॅम मेल्स जीमेलवर वर खूप जागा घेतात आणि काहीवेळा त्या निरुपयोगी मेलमुळे आपले कामाचे पाहायचे राहून जातात. पण या मेल्समुळे आपले जीमेल स्टोरेज भरून जाते. आज अशी एक जबरदस्त ट्रिक जाणून घेणार आहोत, जिच्‍या मदतीने तुमच्‍या जीमेल अकाउंटवर येणारे सर्व अनावश्यक मेल आपोआप डिलीट होतील.

आता, जीमेलवरील हे अनावश्यक मेल्स आपोआप कसे डिलीट होणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण हे शक्य आहे. यासंबंधीची ट्रिक आज आपण जाणून घेऊया. नको असलेले मेल्स आपोआप डिलीट करण्यासाठी, जीमेल तुम्हाला ‘फिल्टर्स फॉर ऑटो-डिलीट’ हे विशेष फीचर देते. हे फीचर कसे वापरायचे ते जाणून घेऊया.

WhatsApp Trick : इंटरनेट नसतानाही वापरता येणार व्हॉट्सअ‍ॅप; जाणून घ्या जबरदस्त ट्रिक

  • सर्व प्रथम तुमचे जीमेल अकाउंट उघडा.
  • आता सर्च बारमध्ये तुम्हाला ‘फिल्टर’ पर्याय दिसेल. जर तुम्हाला सर्च बारमध्ये हा पर्याय दिसत नसेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
  • तुम्हाला हा पर्याय सेटिंग्जमध्ये, ‘फिल्टर्स आणि ब्लॉक अ‍ॅड्रेस’ (Filters and Blocked Addresses) च्या टॅबमध्ये सापडेल. यामध्ये तुम्हाला ‘फिल्टर तयार करा’ (Create Filter) वर क्लिक करावे लागेल.
  • ‘फिल्टर’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला सर्वात वर ‘From’ लिहिलेले दिसेल. तुम्हाला हटवायचे असलेल्या ईमेलचे फक्त नाव किंवा ईमेल अ‍ॅड्रेस येथे टाइप करा.
  • अशा प्रकारे, तुम्हाला नको असलेले मेल अ‍ॅड्रेस निवडले जातील आणि ते डिलीट होतील.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.