February 2, 2023
लाँच पूर्वीच ONE PLUS BUD PRO 2 चे फीचर लिक, वायरलेस चार्जिंगसह ‘हे’ फीचर देणार स्पष्ट आवाज, जाणून घ्या..

हेडफोन किंवा इअरबड्सने गाणी, चित्रपट यातील एक एक बीट आणि बॅकग्राउंड साउंड स्पष्ट ऐकू येतो. यामुळे त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. स्पष्ट आणि गुणवत्तापूर्ण आवाज देणारे बड्स बाजारात उपलब्ध आहेत. वनप्लसने आधीच ग्राहकांसाठी आपला वन प्लस बड प्रो उपलब्ध केला आहे. यामध्ये ऑटो प्ले आणि स्टॉप फीचर असून ते वजनाला हलके आणि वॉटर रेझिस्टंट देखील आहे. त्यानंतर आता वनप्लस ग्राहकांसाठी ONE PLUS BUD PRO 2 लाँच करणार आहे. मात्र, लाँच आधीच त्याचे काही फीचर लिक झाले आहेत.

हे फीचर असण्याची शक्यता

वनप्लस बड प्रो २ मध्ये अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सलेशनसह फास्ट चार्जिंग फीचर असण्याची शक्यता आहे. मात्र त्याचबरोबर या बड बाबत काही नवीन माहिती लिक झाली आहे. त्यात अजून काही फीचर मिळणार असल्याच समोर आले आहे. प्राईज बाबाच्या माध्यमातून ऑनलिक्सने या नव्या बडची माहिती दिली आहे. नव्या बडमध्ये ड्युअल ऑडिओ ड्राइव्हर्स, स्पाशिअल ऑडिओ ज्यामध्ये तुम्हाला चित्रपटगृहातील आवाजासारखा आवाज मिळतो असे फीचर आहेत.

(200 एमपी कॅमेरासह XIAOMI 12 T PRO लाँच, केवळ इतक्या मिनिटांत होणार चार्ज, 12 T मध्येही खास फीचर्स, जाणून घ्या किंमत)

नवीन वनप्लस बड प्रो मध्ये जुन्या वनप्लस बड प्रो प्रमाणेच स्टेम्ड डिझाईन असण्याची अपेक्षा आहे. तसेच बडला सिलिकॉन टीप देखील मिळण्याची शक्यता आहे. तसेच इअरबडमध्ये ४५ डेसिबल पर्यंत नॉइस कॅन्सलेशनचे वैशिष्ट्य असण्याची शक्यता आहे. लिकमध्ये ११ एमएम आणि ६ एमएमचे दोन ड्राईव्हर मिळणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. तसेच मनोरंजनासाठी इअरबडमध्ये एलएचडीसी ४.० कोडेक आणि स्पाशिअल ऑडिओ फीचर मिळणार आहे.

वनप्लस इअरबड प्रो २ मध्ये अडाप्टिव्ह अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सलेशन (एएनसी) फीचर मिळणार आहे. जे तुमच्या सभोवतालच्या वातावरणाच्या आधारावर आवाजाचे स्तर कमी किंवा जास्त करेल. एएनसी सुरू असताना इअरबड ६ तास चालेल, तसेच केससह ते २२ तास चालेल, तर एएनसी बंद असताना इअरबड ९ तास चालेल, तसेच केससह ते ३८ तास चालणार असल्याचे लिकमधून स्पष्ट झाले आहे.

(सुवर्ण संधी! फ्लिपकार्टच्या दसरा सेलमध्ये iphone 13 वर ९ हजार ९१० रुपयांची सूट, ‘हे’ केल्यास आणखी होईल बचत)

ONE PLUS BUD PRO 2 च्या केसमध्ये वायरलेस चार्जिंगचे फीचर असणार आहे. तसेच त्यात ब्ल्युटूथ ५.२ देण्यात आले आहे. त्याचबरोबर, गुगल फास्ट पेअर सपोर्ट असणार आहे. इअरबड आयपी ५५ डस्ट आणि वॉटर रेझिस्टेंट असणार आहे. काळ्या, पांढऱ्या आणि हिरव्या रंगांमध्ये हा इअरबड ग्राहकांसाठी उपलब्ध होणार असल्याचे लिकमधून समजले आहे. लिकमधील माहिती खरी असल्याचे वनप्लसने सांगितलेले नाही. आता लाँच नंतरच या माहितीची पुष्टी होऊ शकेल.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.