February 2, 2023
OnePlus 10RT to launch in India soon

OnePlus कंपनी सध्या OnePlus 10T स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. असं सांगण्यात येतंय की, या वर्षी लाँच होणारा OnePlus हा शेवटचा फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल. यानंतर, कंपनी २०२३ मध्ये OnePlus 11 सीरीज आणेल. तथापि, टिपस्टर मुकुल शर्माच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, वनप्लस आजकाल आणखी एका स्मार्टफोनवर काम करत आहे, जो OnePlus 10RT नावाने सादर केला जाऊ शकतो. या वनप्लस स्मार्टफोनची इंटरनल टेस्टिंग भारतात सुरू झाली आहे. OnePlus 10RT स्मार्टफोन मॉडेल क्रमांक CPH2413 सह ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) प्रमाणपत्रामध्ये सूचीबद्ध करण्यात आला आहे. टिपस्टर मुकुल शर्माने आगामी स्मार्टफोनची काही संभाव्य वैशिष्ट्ये देखील शेअर केली आहेत. OnePlus 10RT स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. वनप्लसचा हा फोन दोन कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाऊ शकतो. यासोबतच फोनमध्ये १२०Hz एमोलेड पॅनल देखील दिला जाईल. तर जाणून घेऊया OnePlus 10RT स्मार्टफोनबद्दल आतापर्यंतची माहिती.

OnePlus 10RT लवकरच लाँच होईल?

OnePlus 10RT ची भारतात लाँच झाल्याची बातमी धक्कादायक आहे. आतापर्यंत असे सांगितले जात होते की OnePlus 10T स्मार्टफोन कंपनीचा शेवटचा फ्लॅगशिप स्मार्टफोन असू शकतो. OnePlus 10RT स्मार्टफोन मॉडेल क्रमांक CPH2413 सह BIS प्रमाणपत्रामध्ये दिसला आहे. अशा परिस्थितीत वनप्लसचा हा फोन लवकरच भारतीय बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे.

( हे ही वाचा: Samsung चा बजेट फ्री स्मार्टफोन बाजारात दाखल; जाणून घ्या किंमत आणि फीचर्सबद्दल)

OnePlus 10RT चे तपशील

  • १२०Hz एमोलेड पॅनेल
  • १२जीबी पर्यंत रॅम, २५६जीबी स्टोरेज
  • OxygenOS 12 Android 12 वर आधारित आहे
  • ५०एमपी + ८एमपी + २एमपी ट्रिपल रिअर कॅमेरे
  • १६एमपी सेल्फी कॅमेरा

टिपस्टर मुकुल शर्मा म्हणतात की OnePlus 10RT स्मार्टफोनमध्ये १२०Hz रिफ्रेश रेटसह एमोलेड डिस्प्ले पॅनेल असेल. OnePlus चा हा स्मार्टफोन दोन स्टोरेज पर्यायांसह ऑफर केला जाऊ शकतो ८जीबी रॅम / १२८ जीबी स्टोरेज मॉडेल आणि १२ जीबी / २५६जीबी स्टोरेज. OnePlus 10RT स्मार्टफोन Android १२ वर आधारित OxygenOS १२ स्किनवर चालेल. OnePlus 10RT स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये ५०एमपी प्राथमिक कॅमेरा सेन्सर, ८एमपी दुय्यम कॅमेरा सेन्सर आणि २एमपी तृतीय कॅमेरा सेन्सर असेल. OnePlus च्या या फोनमध्ये १६एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. यासोबतच OnePlus चा आगामी OnePlus 10RT स्मार्टफोन ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाईल.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.