December 1, 2022
OnePlus Nord 2T when and where to buy

प्रीमिअम स्मार्टफोन बनवणारी कंपनी वनप्लसने आज म्हणजेच १ जुलै रोजी आपला नवीन स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड २टी (OnePlus Nord 2T) भारतात लाँच केला आहे. युरोपीय देशांमध्ये हा फोन आधीच लॉंच झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला जबरदस्त बॅटरीसह अनेक फीचर्स दिले जात आहेत. फीचर्सनुसार या मोबाईलची किंमतही खूपच कमी आहे. वनप्लस नॉर्ड २टीचे सर्व फीचर्स, त्याची किंमत आणि विक्रीची तारीख याबद्दल अधिक तपशील जाणून घेऊया.

या स्मार्टफोनची रचना वनप्लस नॉर्ड २ सारखीच आहे आणि यात नवीन मीडियाटेक चिप आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या मिड-रेंज ५जी स्मार्टफोनची किंमत २८,९९९ रुपये आहे आणि तो ५ जुलैपासून अ‍ॅमेझॉनवरून खरेदी करता येईल. ही किंमत ८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलसाठी आहे. याचे १२जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ३३,९९९ रुपये सांगितली जात आहे.

लवकरच WhatsApp वरही मिळणार अवतार फीचर; जाणून घ्या कसे करणार काम

वनप्लस नॉर्ड २टी स्मार्टफोनमध्ये ६.४३ इंचाचा एफएचडी+९०एचझेड एमोलेड डिस्प्ले आहे. हा वनप्लस फोन मिडियाटेकच्या डायमेंसिटी १३०० एसओसीसह सादर करण्यात आला आहे. वनप्लस नॉर्ड २टी स्मार्टफोन नवीनतम अँड्रॉइड १२ वर आधारित ऑक्सिजन ओएस १२.१ वर चालतो.

वनप्लस नॉर्ड २टी स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्राथमिक कॅमेरा ५० एमपी वाइड अँगल लेन्स आहे, ज्यामध्ये कंपनीने ८एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २एमपी डेप्थ कॅमेरा सेन्सर दिला आहे. यासह, वनप्लस नॉर्ड २टी स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२एमपी सेल्फी कॅमेरा आहे. या वनप्लस फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्टीरिओ स्पीकर, ४५०० एमएएच बॅटरी आणि ८० वोल्ट फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट देण्यात आला आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.