December 1, 2022
EPFO

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही एक आजीवन ठेव आहे जी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्प्यांमध्ये उपयोगी पडते. यामध्ये कर्मचार्‍यांच्या मासिक मूळ पगाराच्या १२ टक्के रक्कम असते, जी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मध्ये (EPFO) जमा होते. यामध्ये नियोक्ता म्हणजेच कंपनी तर्फे देखील एक योगदान दिले जाते. ईपीएफओचे सदस्य/ कर्मचारी E- SEW (ई-एसईडब्ल्यू) पोर्टलद्वारे सहजपणे त्यांचा पीएफ ऑनलाइन काढू शकतात. सहसा ही रक्कम निवृत्तीनंतरच्या काळासाठी म्हणून राखीव ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र गरजेनुसार यातील काही रक्कम आपण वैयक्तिक खात्यात काढून घेऊ शकता.

साधारणतः कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्यांची पीएफ मधील संपूर्ण बचत आपल्या वैयक्तिक खात्यात काढू शकतात. तथापि, सेवानिवृत्तीच्या , काही कारणास्तव आपल्याला गरज असल्यास काही निकष पूर्ण करून आपण काही अंशी रक्कम काढू शकता.एक गोष्ट लक्षात घ्या की, खाते ऑनलाइन ट्रान्सफर करण्यासाठी पीएफ खाते फक्त आधारशी लिंक केले पाहिजे. तसेच, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेमध्ये मोबाईल क्रमांक व इतर महत्त्वाची माहिती अपडेट केलेली असावी.

भविष्य निर्वाह निधी काढण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे

 • पीएफ खात्यात पैसे जमा करण्यासाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) शी आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. हे EPFO ​​वेबसाइटद्वारे किंवा उमंग मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन करता येईल.
 • पीएफ काढण्यापूर्वी “तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या” किंवा KYC (केवायसी) औपचारिकता पूर्ण करणे देखील महत्त्वाचे आहे.
 • केवायसीसाठी, पॅन कार्ड असणे आवश्यक आहे आणि ईपीएफओ प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, पीएफ खात्याला “व्हेरिफाय” स्वरूप येते.

भविष्य निर्वाह निधी काढण्यासाठी महत्त्वाच्या स्टेप्स

 • https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंक वरून UAN पोर्टलला भेट द्या
 • तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा आणि पडताळणीसाठी कॅप्चा टाका..
 • पुढील स्क्रीनवर, तुमचा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा आणि ‘पडताळणी’ वर क्लिक करा.
 • आता ‘Yes’ वर क्लिक करा आणि पुढे जा.
 • यानंतर, ‘प्रोसीड फॉर ऑनलाइन क्लेम’ वर क्लिक करा.
 • आता क्लेम फॉर्ममध्ये, ‘मला अर्ज करायचा आहे’ या टॅब अंतर्गत तुम्हाला आवश्यक असलेला दावा निवडा.
 • तुमचा निधी काढण्यासाठी ‘पीएफ अॅडव्हान्स (फॉर्म 31)’ निवडा. नंतर अशा मागणीचा उद्देश, आवश्यक रक्कम आणि कर्मचार्‍यांचा पत्ता प्रदान करा.
 • आता, प्रमाणपत्रावर क्लिक करा आणि तुमचा अर्ज सबमिट करा.

तुम्ही ज्या उद्देशाने फॉर्म भरला आहे त्यासाठी तुम्हाला स्कॅन केलेली कागदपत्रे सबमिट करण्यास सांगितले जाऊ शकते. नियोक्त्याने पैसे काढण्याची विनंती मंजूर केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पैसे मिळतील. बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी साधारणपणे 15-20 दिवस लागतात.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.