November 27, 2022
bosch india campus


बंगळुरु : बॉश या तंत्रज्ञान आणि सेवा प्रदाता कंपनीने भारतातील आपल्या एआयओटी उपक्रमांमध्ये वृद्धी करत बंगळुरुमधील अदुगोडी येथील मुख्यालयाला स्पार्क.एनएक्सटी (Spark.NXT) या नव्या स्मार्ट कॅम्पसमध्ये बदलले आहे. गेल्या पाच वर्षांत बॉशने या कॅम्पसच्या विकासकामांसाठी ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या कॅम्पसमध्ये १०००० सहकाऱ्यांना सामावून घेण्याची क्षमता आहे. ७६ एकरांवरील हे कॅम्पस बॉशचे भारतातील पहिले स्मार्ट कॅम्पस आहे. या कॅम्पसमध्ये शाश्वतता, सुरक्षितता तसेच येथे भेट देणाऱ्या व्यक्तींना चांगला अनुभव मिळावा यासाठी विविध स्मार्ट पर्यायांचा वापर करण्यात आला आहे.

बॉश जितकी जर्मन आहे तितकीच भारतीयही – पंतप्रधान मोदी

“भारत आणि बॉश इंडिया दोघांसाठी हे वर्ष फार खास आहे. याच वर्षी देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहे आणि बॉश भारतातील आपल्या अस्तित्वाची शतकपूर्ती आहे. १०० वर्षांपूर्वी बॉशने एक जर्मन कंपनी म्हणून भारतात प्रवेश केला आणि आता ही कंपनी जितकी जर्मन आहे तितकीच भारतीयही आहे. जर्मन अभियांत्रिकी आणि भारतीय ऊर्जा यांचं हे एक उत्तम उदाहरण आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी बॉश स्मार्ट कॅम्पसच्या उद्घाटनावेळी म्हणाले.

 “भारतासाठी आणि जगासाठी भविष्यकालीन उत्पादने आणि पर्याय निर्माण करण्यात हे कॅम्पस सर्वात पुढे असेल. बॉशने भारतात अधिक कार्याच्या दृष्टीने विचार करावा आणि पुढील २५ वर्षांसाठी लक्ष्यनिश्चिती करावी, असे मी आवाहन करतो,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होते. बॉश इंडियाने केलेल्या कामाचे, विशेषत: कर्नाटकातील कामाचे त्यांनी कौतुक केले. “बॉश इंडियाच्या स्पार्क.एनएक्सटी कॅम्पसच्या उद्घाटन समारंभाचा भाग असणं ही आनंदाची बाब आहे. अनेक दशके ही कंपनी राज्यात कार्यरत आहे आणि त्यांचे भारतातील सर्वात मोठे कॅम्पस इथे आहे, ही फारच भारावून टाकणारी बाब आहे. कर्नाटक, विशेषत: बंगळुरु हे टेक्नॉलॉजी हब आहे आणि जगभरातील सर्वाधिक संशोधन आणि विकास सेंटर्स इथे आहेत. हे कॅम्पस म्हणजे शहराच्या मुकुटातील आणखी एक मानाचा तुरा आहे,” असे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले.

“या कॅम्पसमध्ये ऑटोमोटिव्ह आणि नॉन-ऑटोमोटिव्ह अशा दोन्ही प्रकारचे संशोधन आणि विकास करण्याची क्षमता आहे आणि यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात या शहराचे नेतृत्व आणखी वरच्या पातळीवर पोहोचेल, अशी मला आशा आहे,” असे ते म्हणाले.

बॉश इंडियाचे १०००० हून अधिक सहकाऱ्यांना प्रशिक्षण

बॉश इंडिया आपल्या जागतिक दर्जाच्या एआय, आयओटी, ऑटोमेशन आणि डिजिटलायझेशन क्षमतांच्या आधारे शाश्वत, स्वावलंबी आणि भविष्यासाठी सज्ज भारताचा आपला दृष्टिकोन या स्मार्ट कॅम्पसमध्ये राबवत आहे. कामकाजाच्या नव्या पद्धतींसाठी आपली संशोधन आणि विकास क्षमता अधिक विकसित करण्यासाठी बॉश इंडियाने १०००० हून अधिक सहकाऱ्यांना मागील दोन वर्षांत सर्वसमावेशक रिस्किलिंग उपक्रमांतून प्रशिक्षण दिले आहे.

“भारतात अधिक चांगल्या दर्जाची जीवनशैली असावी यासाठी स्पार्क.एनएक्सटी कॅम्पसमध्ये असोसिएट्सना वापरकर्ताकेंद्री नाविन्यता निर्माण करण्यावर भर देता येईल असे प्रोत्साहनपर वातावरण असेल,” असे रॉबर्ट बॉश जीएमबीएचच्या इंडस्ट्रिअल रिलेशन्सच्या संचालक आणि व्यवस्थापन मंडळाच्या सदस्य फिलिझ अल्ब्रेक्ट म्हणाल्या. फिलिझ अल्ब्रेक्ट  या १ जुलै २०२२ पासून या पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. “एक जागतिक स्तरावरील कंपनी म्हणून बॉशने १५० हून अधिक देशांमधील असोसिएट्सना एकत्र आणले आहे. अस्सलतेसोबत सांस्कृतिक बहुविधतेचा मेळ असणारी लवचिक आणि सर्वसमावेशक कार्यसंस्कृती आम्ही जपतो. आपल्या व्यापक स्मार्ट पर्यायांसह हे कॅम्पस आमची हरित परिसंस्था निर्माण करण्याची बांधिलकी अधोरेखित करेल. यामुळे आमच्या प्रत्येक कृतीमध्ये शाश्वततेला चालना देत प्राधान्यक्रमाचे नियोक्ते बनवण्याची क्षमता आम्हाला मिळते,” असेही अल्ब्रेक्ट म्हणाल्या.

सरकारच्या आत्मनिर्भर भारत दृष्टिकोनाला पाठबळ – सौमित्र भट्टाचार्य

“मागील १०० वर्षांपासून भारतातील बदलांमध्ये बॉशचा सहभाग आहे आणि सध्याच्या या युगात आम्ही दळणवळण आणि त्यापलिकडील परिसंस्थेत क्रांती घडवली आहे. आमच्या नव्या स्पार्क.एनएक्सटी कॅम्पससह ही कंपनी‘इन्व्हेंटेड फॉर लाईफ’ म्हणजे जीवनासाठी शोधल्या गेलेल्या स्मार्ट आणि शाश्वत पर्यायांमध्ये यापुढेही गुंतवणूक करीत राहील आणि सरकारच्या आत्मनिर्भर भारत या दृष्टिकोनाला पाठबळ देत राहील,” असे बॉश लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि बॉश ग्रूप, इंडियाचे अध्यक्ष सौमित्र भट्टाचार्य म्हणाले.

नव्या अदुगोडी बॉष कॅम्पसमध्ये दीर्घकालीन टप्प्यात ऊर्जा वापर कमी व्हावा यासाठी कंपनीने ५० कोटी रुपये (६ दशलक्ष युरोज) गुंतवले आहेत. कॅम्पसमधील सोलार पॅनल आणि ग्रीन ग्रूप कॅप्टिव्ह पॉवर खरेदी करून त्यांच्या एकूण ऊर्जेतील ८५ टक्क्यांपर्यंतची गरज भागवली जाईल. भारतातील बॉशच्या वार्षिक पाण्याच्या मागणीपैकी जवळपास दोन तृतीयांश गरज पर्जन्य जल संवर्धन प्रकल्पातून भागवली जाणार आहे. पर्जन्यजल संवर्धनासाठी ९० लाख लिटर क्षमतेच्या भूमिगत टाक्यांचे अतिरिक्त हरित आच्छादन पाण्याची मागणी ६० टक्क्यांनी कमी करेल. बॉशने विविध स्मार्ट, शाश्वत आणि वापरकर्तास्नेही पर्याय वापरून कॅम्पसमध्ये भविष्यकालीन कार्यपद्धतीच्या दिशेने कूच केली आहे

पाणी व्यवस्थापनाचे पर्याय आणि ऊर्जा बचत

बॉश डीपसाइट्स (DEEPSIGHTS) हे इंडस्ट्री ४.० साठीचे आधुनिक एआयओटी समर्थित अॅनालिटिक्स व्यासपीठ आहे. शाश्वततेला चालना देण्यासाठी तसेच स्रोतांचा कमाल वापर आणि सुविधांचे व्यवस्थापन करण्यासाठी यात स्मार्ट एनर्जी आणि जल व्यवस्थापनाचे पर्याय पुरवले जातात. दरवर्षी ६ टक्के ऊर्जा बचत करून हे व्यासपीठ कार्यचलनात्मक परिणामकारकता ८ टक्क्यांनी सुधारते.

कॅम्पसमधील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर

बॉश इंटेलिजंट एअर कंडिशनिंग अॅण्ड कम्फर्ट असिस्टंट (BIANCA) हे स्मार्ट सोल्युशन आहे. कॅम्पसमध्ये कर्मचाऱ्यांनी अधिक आरामदायी वाटावे आणि कॅम्पसमधील कार्बन उत्सर्जन कमी व्हावे यासाठी ही सुविधा तयार करण्यात आली आहे. माणसांची संख्या आणि त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या आधारे हीटिंग, वेंटिलेटिंग आणि एअर कंडिशनिंग (HVAC) ऑपरेशन्स सह BIANCA ३० ते ५० टक्क्यांनी HVAC ऊर्जा वापर कमी करू शकते.

बॉशने सभोवतालच्या हवेचा दर्जा जोखणारी यंत्रणाही विकसित केली आहे. यामुळे सतत ध्वनी आणि वायू प्रदुषणाचे मुख्य घटक नोंदवले जातील. यासंदर्भातील माहिती लगेचच म्हणजे रीअल टाईममध्ये सहकाऱ्यांना दिली जाईल. जेणेकरून त्यांचे आरोग्य जपले जाईल.

प्रदूषणाची

कॅम्पसमध्ये कोणत्याही अडचणींशिवाय फिरता यावे यासाठी वेफाइंडर अॅप्लिकेशन आहे. त्याचप्रमाणे पार्कझेयूस (Park ZEUS) या स्मार्ट पार्किंग सुविधेमुळे असोसिएट्स आणि कॅम्पसला भेट देणाऱ्यांना सहजसोप्या पद्धतीने पार्किंग करता येते आणि त्यामुळे हे काम सोयीस्कर होते. पार्किंगसाठी ३ ते ४ मिनिटांचा वेळ वाचतो म्हणजेच वार्षिक १५०० हून अधिक मानवी दिन, २५०० हून अधिक लीटर इंधन आणि ५००० किलोहून अधिक कार्बनची बचत होते. या सुविधेमुळे सुरक्षिततेसाठीचे मानवी प्रयत्नही ५० टक्क्यांनी कमी होतात.

सुरक्षिततेसाठी स्मार्ट पर्याय

बॉश बिल्डिंग टेक्नॉलॉजीसमध्ये सुरक्षिततेसाठी स्मार्ट पर्याय उपलब्ध आहेत. या अनोख्या अॅप्लिकेशनमध्ये उपलब्धतेवरील नियंत्रण, घुसखोरीची सूचना आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन असलेल्या आधुनिक व्हिडीओ अॅनालिटिक्ससह इंटेलिजंट सर्विलन्सची सुविधा मिळते.

स्पार्क.एनएक्सटी कॅम्पसमध्ये भेट देणाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आनंददायी अनुभव मिळावा यासाठी व्हिझिटर मॅनेजमेंट सिस्टमची रचना करण्यात आली आहे. तसेच यातून फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये सूसुत्रता आणून प्रतिक्षा कालावधी ७५ टक्क्यांनी कमी केला जातो.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.