January 27, 2023
Rakhi Sawant Big Decision Saying it is not allowed in Islam

Rakhi Sawant Viral Video: खूप वर्षांनी आता राखी सावंत हिच्या आयुष्यात प्रेमाची पालवी बहरताना दिसत आहे. बॉयफ्रेंड आदिल खान सह लवकरच राखी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या सुद्धा चर्चा आहेत. मुख्य म्हणजे यावेळी केवळ राखीचा नव्हे तर प्रत्यक्ष तिचा बॉयफ्रेंड आदिल सुद्धा उघडपणे प्रेमाची कबुली देत आहे. याच एकूण पार्श्वभूमीवर राखीने आता एक मोठा निर्णय घेतल्याचे समजत आहे. इस्लाम धर्मात याची परवानगी नसल्याचे म्हणत राखीने यापुढे आपली ओळखच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

राखी सावंत म्हणजे फॅशनचे विचारापलीकडे केलेले प्रयोग असं समीकरण डोळ्यासमोर येतं, कितीही विचित्र, तोकडे कपडे असले तरी ते मानाने मिरवण्याची धमक राखी सावंत मध्ये आहे. पण आता आपल्या प्रेमासाठी राखी आपले रूपच पालटणार आहे. राखीचा प्रियकर आदिल हा इस्लाम धर्मिय असल्याने त्याने मी माझ्या धर्माचा मान ठेवण्यासाठी सगळं काही कारेन असा पवित्रा घेतला होता मात्र आपण यात राखीला जबरदस्ती करणार नाही असेही तो म्हणाला होता. तरीही राखीने स्वेच्छेने आदिलच्या प्रेमासाठी बुरखाही घालेन असे म्हंटले होते.

राखीने सांगितले की, तिला तोकडे कपडे परिधान केल्याबद्दल पश्चाताप होतो. आदिलसोबतच्या तिच्या नवीनतम फोटोशूटमध्ये राखीने डीप नेकलाइनचा मेटॅलिक गाऊन घातला होता. राखीने सांगितले की तिचा ड्रेस अगदी शेवटच्या क्षणी आला आणि तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. यासाठी मी आदिलची माफी मागते इस्लाम धर्मात असे कपडे चालत नाहीत त्यामुळे मी सुद्धा यापुढे असे कपडे घालणे टाळणार आहे असेही राखी म्हणाली. यामध्ये सर्व दोष फॅशन डिझायनर्सचा आहे असेही राखीने म्हंटले आहे.

राखी सावंत म्हणते मला माफ करा…

T20WC: माझं प्रेम सांगतं… ऋषभ पंतच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाला गेली उर्वशी पण.. आता म्हणते, ‘कोई इतना बेदर्द..

दरम्यान काही दिवसांपूर्वी भोजपुरी अभिनेत्री शहर अफशा हिने अल्लाहची माफी मागत आपण आता मनोरंजन सृष्टीला अलविदा करत असल्याचे म्हंटले होते. आता त्यापाठोपाठ राखीने सुद्धा बॉयफ्रेंडच्या इस्लाम दजार्मासाठी आपली ओळख बदलण्याचे ठरवले आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.