December 1, 2022
Realme TechLife Buds T100

एखाद्या दिवशी आपण इयरबड्स चार्ज करायला विसरतो आणि नेमके प्रवासाच्या दरम्यान ते बंद पडतात.. पुढचा अख्खा प्रवास कंटाळवाणा होतो. हि परिस्थिती कदाचित आपणही अनुभवली असेलच. पण आता याच समस्येवर रिअलमी (Realme) ने एक तोडगा शोधला आहे. रिअलमी टेकलाइफ बड्स T100 (Realme TechLife Buds T100) च्या रूपात एक दोन नव्हे तर चक्क २८ तास टिकणाऱ्या बॅटरी पॉवर सह रिअलमी एक इयरबड्स डिझाईन भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. येत्या १८ ऑगस्टला रात्री ११.३० वाजता हे डिव्हाईस लाँच केले जाणार असून एकदा पूर्ण चार्जिंग केल्यावर याचा २८ तास वापर केला जाऊ शकतो अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात येत आहे.

रिअलमी द्वारे कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर हे नवे रिअलमी टेकलाइफ बड्स T100 हे डिव्हाईस लाँच केले जाणार आहे. मात्र तत्पूर्वी या डिव्हाईसच्या काही फीचर्स बाबत कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे.

Realme TechLife Buds T100 चे भन्नाट फीचर्स

  • रिअलमी टेकलाइफ बड्स T100 हे हटके डिझाईन १० mm डायनॅमिक ड्राइव्हर्ससह तयार करण्यात आले आहे.
  • हे दोन्ही इयरबड्स टच इनेबल्ड सेन्सर सह येतील.
  • सुरुवातीला यामध्ये दोन रंगांचे पर्याय दिले जाणार आहेत.
  • यामध्ये डॉल्बी एटमॉस सपोर्ट आणि ब्लूटूथ वी5.2 कनेक्टिविटी देण्यात आली आहे.
  • यूएसबी टाइप-सी चार्जिंग सह चार्ज केल्यास हे डिव्हाईस सात तास तर चार्जिंगच्या केस सह तब्बल ३० तासांची बॅटरी पॉवर प्रदान करू शकेल.

यापूर्वी लाँच केलेल्या Realme Buds Air Neo 3 मध्ये IPX5 वॉटर रेसिस्टंट फीचर आहे. ज्यामुळे एका मर्यादेपर्यंत पाऊस, घाम यामुळे होणारे नुकसान थांबवता येते. नव्या कोऱ्या डिझाईन मध्ये सुद्धा हे फीचर समाविष्ट केले जाऊ शकेल. तूर्तास कंपनीकडून या डिव्हाईसच्या किंमतीबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

‘हा’ Whatsapp Number तुमच्या फोनमध्ये असायलाच हवा; नाहीतर ऐनवेळी होऊ शकते पंचाईत

दरम्यान, जुलै मध्येच रिअलमी तर्फे एयर 3 नियो ट्रू वायरलेस इयरफोनची घोषणा केली गेली होती ज्याची किंमत १, ९९९ इतकी आहे, नव्या डिझाईनची किंमत याहून किंचित अधिक असण्याची शक्यता आहे मात्र बाजारातील अन्य काही कंपनीच्या तुलनेत ही डील फायद्याची ठरू शकते.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.