December 1, 2022
Redmi-K50i

Redmi K50i स्मार्टफोनशी संबंधित बातम्या सातत्याने समोर येत आहेत. Redmi चा हा नवीन स्मार्टफोन बुधवार २० जुलै रोजी भारतात लॉंच होणार आहे. हा फोन Xiaomi च्या सब-ब्रँडद्वारे दुपारी १२ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात सादर केला जाईल. फोनचा हा लॉंच इव्हेंट Redmi च्या अधिकृत Youtube चॅनलवर थेट पाहता येईल.

Redmi K50i स्मार्टफोनबद्दल अहवालात दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी चीनमध्ये लॉंच झालेल्या Redmi Note 11T Pro+ ची रीब्रँडेड वर्जन असेल. नवीन Redmi K50i मधील बहुतांश फीचर्स Redmi Note 11T Pro प्रमाणेच असण्याची अपेक्षा आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimension 8100 प्रोसेसर, ६.६ inch FullHD + १४४ Hz IPS LCD स्क्रीन, Dimension 8100 chipset सारखी फीचर्स असू शकतात. Redmi च्या आगामी हँडसेटमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सल प्रायमरी, ८ मेगापिक्सल अल्ट्रावाईड आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर देण्यात आल्याचे वृत्त आहे. याशिवाय, ४४०० mAh बॅटरीसह नवीन रेडमी फोनमध्ये ६७ W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

आणखी वाचा : सर्वात मोठा सेल! २३ जुलैपासून सुरू होतोय Flipkart Big Saving Days Sale, स्मार्टफोन्सवर बंपर ऑफर

Redmi K20 सीरीजनंतरचा पहिला फोन
२०१९ मध्ये Redmi ने भारतात Redmi K20 आणि K20 Pro स्मार्टफोन लॉंच केला आहे. यानंतर ब्रँडद्वारे लॉंच केला जाणारा Redmi K50i स्मार्टफोन हा कंपनीच्या K-सीरीजचा भारतातील पहिला फोन असेल. Redmi K20 सीरीजमधील आणखी काही फोन चीनमध्ये लॉंच करण्यात आला होता आणि तो Poco डिव्हाइसेस म्हणून भारतात रीब्रँड करण्यात आला होता. Redmi K30 प्रमाणे स्मार्टफोन भारतात Poco X2 म्हणून लॉंच करण्यात आला होता तर Redmi K40 गेमिंग एडिशन Poco F3 GT म्हणून लॉंच करण्यात आला होता.

आणखी वाचा : २५,००० रूपयांमध्ये नवीन लॅपटॉप लॉंच, Infinix InBook X1 Neo मध्ये फास्ट चार्जिंगसह ‘हे’ आहेत फिचर्स…

रिपोर्ट्सनुसार, Redmi K50i स्मार्टफोन देशात Android 12 आधारित MIUI ग्राहक इंटरफेससह लॉंच केला जाऊ शकतो. Redmi K50i स्टील ब्लॅक, फँटम ब्लू आणि क्विक सिल्व्हर कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.