December 5, 2022
India House at Paris

क्रीडा जगतामध्ये ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांना अनन्य साधारण महत्त्व आहे. या स्पर्धेमध्ये भारताला आतापर्यंत म्हणावी अशी कामगिरी करता आलेली नाही. भविष्यात या स्पर्धेत भारतातील जास्तीत जास्त खेळाडू सहभागी होती आणि पदकांची कमाई करतील यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) आणि भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) हातमिळवणी केली आहे. याचाच एक भाग म्हणून आरआयएल आणि आयओए २०२४ ऑलिंपिकसाठी पॅरिसमध्ये पहिले-वहिले ‘इंडिया हाऊस’ स्थापन करणार आहेत.

२०२४ पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताचे पहिले ऑलिंपिक हाऊस उभे राहणे, हा मैलाचा दगड ठरणार आहे. जागतिक खेळांमध्ये भारत प्रगती करत आहे, याचे हे उदाहरण ठरणार आहे. अधिकृत ऑलिंपिक हाऊस हे लाखो चाहत्यांना आणि पर्यटकांना संबंधित देशाचे खेळाप्रती असलेल्या धोरणांचा आढावा देते. याशिवाय, या माध्यमातून क्रीडा अधिकारी, क्रीडापटूंशी संवाद साधण्यासाठीही याची मदत होते.

२०१६च्या रिओ ऑलिंपिकमध्ये ५०हून अधिक राष्ट्रांनी त्यांचे हॉस्पिटॅलिटी हाऊस स्थापन केले होते. यामुळे या देशांच्या सांस्कृतिक आणि क्रीडा इतिहासाची ओळख जगाला झाली होती. आता २०२४ पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताचेही असे हाऊस असेल.

हेही वाचा – Photos : स्मृती मंधाना ते दीपिका पल्लीकल… राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकासाठी लढताना दिसणार ‘फिअरलेस ब्युटीज’

भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सरचिटणीस राजीव मेहता म्हणाले, “भारतीय ऑलिंपिक संघटनेसोबतच्या या भागीदारीबद्दल आणि भारतीय खेळांना समर्थन देण्यासाठी मी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नीता अंबानी यांचे आभार मानतो. पॅरिसमध्ये भारताचे हाऊस, असणे ही एक महत्त्वाची बाब आहे.”

आयओसी सदस्य आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक नीता अंबानी म्हणाल्या, “भारताला जागतिक क्रीडा क्षेत्रात केंद्रस्थानी पाहणे, हे आमचे स्वप्न आहे. आयओए सोबतच्या भागीदारीतून रिलायन्स फाऊंडेशन देशातील तरूण खेळडूंना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करेल. २०२४ मधील पॅरिस ऑलिंपिक गेम्समध्ये पहिल्या-वहिल्या इंडिया हाऊसचे यजमानपद भूषवण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. भारताची अफाट प्रतिभा, क्षमता आणि आकांक्षा जगासमोर दाखवण्याची ही एक उत्तम संधी असेल.”

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.