December 5, 2022
Rohit Sharma

India tour of West Indies : भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांदरम्यान पाच सामन्यांची टी २० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने यजमानांचा ६८ धावांनी पराभव केला होता. त्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ४४ चेंडूत ६४ धावांची खेळी केली होती. त्यामुळे आज (१ ऑगस्ट) होणाऱ्या दुसऱ्या सामन्यातही रोहितकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहे. विशेष म्हणजे आजच्या सामन्यात रोहित शर्मा आफ्रिकेच्या माजी कर्णधाराचा एक मोठा विक्रम मोडू शकतो.

रोहित शर्मा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने आतापर्यंत ४७३ षटकार मारण्याचा पराक्रम केलेला आहे. तर, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४७६ षटकार ठोकलेले आहेत. आजच्या सामन्यात रोहितने तीन षटकार मारले तर तो आफ्रिदीची बरोबरी करेल. शिवाय, चार षटकार मारून त्याला आफ्रिदीचा विक्रम मोडण्याचीही संधी आहे.

हेही वाचा – T20 International Cricket: पाकिस्तानला पराभूत करून हरमनप्रीतने मोडला धोनीचा ‘हा’ विक्रम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडीजचा खेळाडू ख्रिस गेल याच्या नावावर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५५३ षटकार मारलेले आहेत. गेलपर्यंत पोहण्यासाठी मोठा टप्पा पार करावा लागेल. मात्र, शाहिद आफ्रिदीची आकडेवारी रोहितच्या टप्प्यात आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याने चार षटकार मारावेत, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.

दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी २० सामना सोमवारी (१ ऑगस्ट) सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्क येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.