February 1, 2023
Rupay Credit Card: अरे वा! आता दोन हजार रुपयांपर्यंतचे UPI पेमेंट मोफत; ‘एन पी सी आय’ ची घोषणा, जाणून घ्या सविस्तर…

Rupay Credit Card: युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय ) द्वारे रूपे क्रेडिट कार्डवरून २ हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एन पी सी आय) आपल्या एका परिपत्रकात ही घोषणा केली आहे. या परिपत्रकात रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार ही सवलतरूपे क्रेडिट कार्ड धारकांना देण्यात आल्याचे म्हटले आहे.

एन पी सी आयने रुपे क्रेडिट कार्ड गेल्या चार वर्षांपासून कार्यरत आहे. हे सर्व प्रमुख बँकांकडून (banks) जारी केले जाते. ४ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, अॅपवर क्रेडिट कार्ड लिंक करणे आणि UPI पिन तयार करणे यासारख्या सर्व प्रकारच्या व्यवहारांसाठी क्रेडिट कार्ड सक्षम करण्यासाठी ग्राहकाची संमती आवश्यक आहे.

शून्य मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर ) २ हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारासाठी लागू असेल,असे एन पीसीआयने स्पष्ट केले. एमडीआर म्हणजे क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे ग्राहकांकडून पेमेंट स्वीकारण्यासाठी व्यापारी बँकेला जी रक्कम भरतो ती रक्कम. एमडीआर व्यवहाराच्या रकमेच्या आधारावर आकारला जातो.

आणखी वाचा : Telegram वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी: कंपनीने कमी केल्या प्रीमियम सबस्क्रिप्शनच्या किमती; जाणून घ्या नवी किंमत…

रूपे हे एनपीसीआयने आणलेले देशीप्लास्टिक कार्ड आहे. देशातील पेमेंट सिस्टीम एकत्रित करणे हा त्याचा उद्देश आहे. देशातील सर्व प्रमुख बँका रूपेडेबिट कार्ड जारी करतात. हे इतर कार्ड्स (युरो पे,मास्टरकार्ड, व्हिसा) सारखेच आहे. सर्व भारतीय बँका,एटीएम,पीओएस टर्मिनल किंवा ई-कॉमर्स वेबसाइटवरहे कार्ड सहजतेने वापरता येते.

एनपीसीआयने असेही म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी अॅपची विद्यमान प्रक्रिया क्रेडिट कार्डसाठी देखील लागू असेल. या श्रेणीसाठी शून्य व्यापारी सवलत दर (MDR) रु. २,००० पेक्षा कमी आणि समान व्यवहाराच्या रकमेपर्यंत लागू असेल.

असे होतील बदल

एमडीआर म्हणजे एखाद्या व्यापाऱ्याने त्याच्या ग्राहकांकडून क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे (credit or debit cards)  पेमेंट स्वीकारण्यासाठी बँकेला दिलेली किंमत. जेव्हा जेव्हा कार्ड एखाद्याच्या व्यापाऱ्याच्या दुकानात पेमेंटसाठी वापरले जाते तेव्हा हे शुल्क देय असते. NPCI ने ही व्यवस्था तात्काळ लागू केली आहे. NPCI ने सभासदांनी याची दखल घेऊन तातडीने अंमलबजावणी करावी असे सांगितले आहे.

परिपत्रकानुसार, क्रेडिट कार्ड जारीकर्ता आणि अॅपने क्रेडिट कार्डच्या जीवन चक्रातील प्रत्येक व्यवहारासाठी ग्राहकांना अशा व्यवहारांची योग्य माहिती पाठवली पाहिजे. या हालचालीमुळे देशांतर्गत पेमेंट गेटवेला चालना मिळेल आणि लोकांमध्ये RuPay कार्ड लोकप्रिय होण्यास प्रोत्साहन मिळेल.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.