December 5, 2022
samsung-fest

देशातील सर्वात मोठी ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंगने पुन्हा एकदा ब्लू फेस्ट १.० ची घोषणा केली आहे. या फेस्टमध्ये दक्षिण कोरियाची कंपनी आपले प्रीमियम टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर, साउंडबार आणि वॉशिंग मशीन आणि इतर अनेक रेंजमधील प्रोडक्ट्स देत आहे. सॅमसंग ब्लू फेस्ट २.० हा १५ जुलैपासून सुरू होणार आहे. हा फेस्ट २१ ऑगस्टपर्यंत सॅमसंगचे अधिकृत ऑनलाइन स्टोअर, सॅमसंग शॉप आणि सर्व प्रमुख ग्राहक इलेक्ट्रॉनिक रिटेल स्टोअरमध्ये चालेल. फेस्ट दरम्यान ग्राहकांना सॅमसंगच्या ग्राहक प्रोडक्ट्सवर एक्सक्लूसिव डील आणि मर्यादित कालावधीच्या ऑफर मिळतील.

विशेष बाब म्हणजे सॅमसंगचे बेस्पोक फॅमिली हब रेफ्रिजरेशन https://www.wiki.com/about/samsung-galaxy/Samsung Galaxy S22 विकत घेतल्यावर मोफत उपलब्ध असेल. याशिवाय ३० टक्के झटपट सूट, २० टक्के अतिरिक्त कॅशबॅक, शून्य डाउन पेमेंटसह सुलभ ईएमआय आणि बंडल डील ऑफर उपलब्ध असतील.

आणखी वाचा : Vivo T1x vs Redmi Note 11: बॅटरी आणि ५० MP कॅमेरासह कोणता फोन चांगला? जाणून घ्या

ब्लू फेस्ट २.० मध्ये सॅमसंग प्रोडक्ट्सवर ऑफर

टीव्ही
सॅमसंग ब्लू फेस्ट २.० दरम्यान, ग्राहकांना टीव्हीवर २५ टक्क्यांपर्यंत झटपट सूट मिळेल. निवडक प्रीमियम टीव्ही मॉडेल्सवर २० टक्के कॅशबॅक उपलब्ध असेल. ब्लू फेस्ट २.० टीव्हीवर ३ वर्षांची वॉरंटी आणि निवडक निओ QLED आणि QLED टीव्हीवर १० वर्षांची नो स्क्रीन बर्न-इन वॉरंटी देखील देते.

रेफ्रिजरेटर्स
सॅमसंग ब्लू फेस्ट २.० दरम्यान, ग्राहक निवडक रेफ्रिजरेटर मॉडेल्सवर २० टक्के कॅशबॅक मिळवू शकतात. याशिवाय झिरो डाऊन पेमेंटसह ईएमआय ऑप्शनवर टीव्हीचा लाभ घेता येईल.

सॅमसंगचा फ्लॅगशिप Galaxy S22 (8GB/128GB) स्मार्टफोन BESPOKE Family Hub™ रेफ्रिजरेटरच्या खरेदीवर मोफत उपलब्ध असेल. हे रेफ्रिजरेटर ९३४ लिटर क्षमतेचे फ्रेंच डोअर रेफ्रिजरेटर आहे. यात २१.५ इंच फॅमिलीहब स्क्रीन आणि २५ W स्पीकर आहेत.

सॅमसंग दही मेस्ट्रो रेफ्रिजरेटर देखील ब्लू फेस्ट २.० मध्ये अनेक डील आणि ऑफर मिळवण्याची संधी आहे. हे फ्रीज १९२ लिटर ते ६९२ लिटर क्षमतेसह येते.

आणखी वाचा : Amazon Prime Day 2022 : अशा पद्धतीने मिळवा फ्री प्राइम सबस्क्रिप्शन आणि OTT कंटेटचा आनंद

साउंडबार
सॅमसंग साउंडबारच्या खरेदीवर ग्राहक ३० टक्के झटपट सूट घेऊ शकता. याशिवाय ग्राहकांना सॅमसंगकडून १० टक्के कॅशबॅकसह EMI पर्याय मिळेल.

वॉशिंग मशीन
सॅमसंग ब्लू फेस्ट २.० मध्ये सॅमसंग वॉशिंग मशीनवर २५ टक्क्यांपर्यंत झटपट सूट मिळू शकते. याशिवाय ९९० रुपयांच्या ईएमआयवर वॉशिंग मशिन आणि शून्य डाउन पेमेंट मिळण्याची संधी आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.