December 5, 2022
samsung-Galaxy-A23

कंपनीने Samsung Galaxy A23 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. सॅमसंगने हा स्मार्टफोन यावर्षी मार्चमध्ये लॉंच केला होता. आता दक्षिण कोरियाच्या कंपनीने फोनच्या किमतीत १००० रुपयांनी कपात केली आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम प्रोसेसर आणि ५००० mAh बॅटरी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Samsung Galaxy A23 Price cut
Samsung Galaxy A23 स्मार्टफोनचा ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंट १९,४९९ रुपयांना आणि ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंट २०,९९९ रुपयांना लॉंच करण्यात आला. दोन्ही फोनच्या किमतीत १००० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. कपातीनंतर ग्राहकांना आता ६ GB रॅम मॉडेलसाठी १८,४९९ रुपये आणि ८ GB रॅम मॉडेलसाठी १९,९९९ रुपये मिळतात. हा स्मार्टफोन ब्लू, ब्लॅक आणि ऑरेंज कलरमध्ये मिळतो.

Samsung Galaxy A23 specifications
Samsung Galaxy A23 स्मार्टफोनमध्ये ६.६ इंचाचा FullHD+ (१,०८०×२,४०८ pixels) LCD डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये ६ GB आणि ८ GB रॅमचा पर्याय आहे. स्मार्टफोनमध्ये १२८ GB इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे. ज्याला मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येऊ शकते.

आणखी वाचा : सर्वोत्तम टीव्ही खरेदी करण्याची उत्तम संधी; ३२, ४२, ४३, ५० आणि ६५ इंच असलेल्या Android स्मार्ट टीव्हीवर ३३% पर्यंत सूट

Samsung Galaxy A13 स्मार्टफोन Android 12 आधारित One UI ४.१ स्किनसह येतो. Samsung Galaxy A23 स्मार्टफोन ड्युअल-सिमला सपोर्ट करतो. फोनमध्ये ऍपर्चर F/१.८, ५ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा F/२.२ अपर्चरसह ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. हँडसेटमध्ये २ मेगापिक्सेल डेप्थ आणि मॅक्रो सेन्सर्स आहेत. Samsung Galaxy A23 स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.

Galaxy A13 स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ४G, Wi-Fi, Bluetooth ५.०, GPS, ३.५ mm हेडफोन जॅक आणि USB Type-C पोर्ट सारखी फीचर्स आहेत. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे जी २५ W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करते. हँडसेटमध्ये एक्सीलरोमीटर, गायरो सेन्सर, जिओमॅग्नेटिक सेन्सर, व्हर्च्युअल लाईट सेन्सर आणि व्हर्च्युअल प्रॉक्सिमिटी सेन्सर आहे. फोनच्या काठावर फिंगरप्रिंट स्कॅनर उपलब्ध आहे. Galaxy A13 ची डायमेंशन १६५.४x ७६.९ x ८.४ मिमी आणि वजन १९६ ग्रॅम आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.