December 5, 2022

सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब!

सभागृहातच नव्हे तर सभागृहाच्या बाहेर सुद्धा आमदार/ खासदारांनी केलेल्या पक्षविरोधी कारवाया, त्यांच्या अपात्रते साठी कारणीभूत ठरू शकतात, हा राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी बिहार जनता दलाच्या दोन खासदार शरद यादव आणि अंवर अन्सारी यांचे राज्यसभा सदस्य पद रद्द करताना दिलेला निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरविला ! त्यामुळे आता पक्षांतर बंदी कायदा हा सभागृहाच्या बाहेर केलेल्या पक्षविरोधी कारवायाना सुद्धा लागू शकतो, हे स्पष्ट झाले आहे .

त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा आलेला निर्णय महाराष्ट्राच्या सद्य परिस्थितीतील शिंदे सेनेच्या शिवसेना पक्ष विरोधी कारवायांच्या संबंधात अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आणि या बंडखोर आमदारांचे सदस्यत्व अपात्र ठरविण्यात हंगामी सभापती नरहरी झिरवाळ यांना खूप मोठे पाठबळ मिळाले आहे !

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.