November 27, 2022
Shoaib Akhtar admitted to hospital

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर रुग्णालयात दाखल झाला आहे. खूप आधीपासूनच तो गुडघ्याच्या समस्येने त्रस्त आहे. या समस्येमुळेच त्याला पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. दरम्यान शोएबच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली असून यानंतर शोएबने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक भावुक व्हिडीओ शेअर केला आहे.

जवळपास गेल्या १० वर्षांपासून शोएब गुडघेदुखीच्या समस्येचा सामना करत आहे. या समस्येमुळेच त्याचे करिअर खूप लवकर संपले अशी खंतही त्याने व्यक्त केली आहे. अन्यथा आणखी चार ते पाच वर्ष तो व्यवस्थित क्रिकेट खेळू शकला असता अशी त्याला खात्री होती. सध्या तो ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथील एका रुग्णालयात दाखल आहे.

या व्हिडीओमध्ये आपण शोएबला भावुक झालेला पाहू शकतो. त्याच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं त्याने या व्हिडीओमध्ये म्हटलंय. त्याने आपल्या चाहत्यांना, तो लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करण्यासही सांगितलं आहे. त्याने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय, “मी आणखी चार ते पाच वर्ष खेळू शकलो असतो. मात्र, मला हे ठाऊक होते की मी जास्त खेळलो तर मी लवकरच व्हीलचेअरवर येऊ शकतो. या कारणामुळेच मी क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.”

Viral Video : हेलिकॉप्टरच्या मदतीने पूल-अप्स करून युट्यूबर्सनी रचला वर्ल्ड रेकॉर्ड; व्हिडीओ एकदा पाहाच

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर रावळपिंडी एक्सप्रेसच्या नावाने प्रसिद्ध होता. त्याच्या गोलंदाजी पुढे मोठ-मोठ्या फलंदाजांना घाम फुटायचा. शोएबच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात वेगवान गोलंदाजीचा विक्रम आहे. शोएबने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १४ टी-20, १६३ एकदिवसीय आणि ४६ कसोटी सामने खेळले. त्‍याच्‍या नावावर टी-20 मध्‍ये २१, एकदिवसीयमध्‍ये २४७ विकेट आणि कसोटीमध्‍ये १७८ विकेट आहेत.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.