January 27, 2023
pv s sindhu singapore open win final

भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात बाजी मारली आहे. तिने चिनच्या वांग झी यीला पराभूत करत सिंगापूर ओपनच्या पदकावर आपलं नाव कोरलं आहे. पीव्ही सिंधूने रविवारी सिंगापूर ओपन २०२२ मधील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या वांग झी यीचा २१-९, ११-२१, २१-१५ असा पराभव केला आहे.

तिने सेमी फायनलमध्ये जपानच्या साईना कावाकामीचा पराभव केला होता. सिंधूने हा सामना २१-१५, २१-७ असा सरळ सेटमध्ये जिंकला होता. यावर्षी सिंधूने सयेद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि स्विस ओपन अशी दोन सुपर ३०० टायटल जिंकली आहेत. त्यानंतर आता सिंगापूर ओपनचं तिसरं पदक आपल्या नावावर केलं आहे.

(सविस्तर बातमी अपडेट होत आहे…)

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.