February 3, 2023
Smartphone Hack : फक्त ५० रुपयांमध्ये करा तुमचा फोन वॉटरप्रूफ; काय आहे ‘ही’ ट्रिक जाणून घ्या

फोटोग्राफी हा अनेकांचा छंद असतो, तर काहींना स्वतःचे नवनवीण फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची आवड असते. यासाठी वेगवेगळे लोकेशन, वेगवेगळ्या थीम यांची निवड केली जाते. यातीलच एक लोकप्रिय प्रकार म्हणजे अंडर वॉटर फोटोग्राफी. पण अंडर वॉटर फोटोग्राफी करण्यासाठी वॉटरप्रूफ फोनची गरज असते. आजकाल काही फोन्स वॉटरप्रूफ असतात पण त्यांची किंमत खूप जास्त असल्याने ते सर्वांकडे उपलब्ध नसतात. अशावेळी तुमच्याकडे असलेल्या फोनलाच तुम्ही फक्त ५० रुपयांमध्ये वॉटरप्रूफ बनवु शकता.

तुमच्या फोनला वॉटर प्रूफ बनवण्यासाठी तुम्हाला फक्त ५० रुपये खर्च करायचे आहेत. यामुळे तुम्ही अंडर वॉटर फोटोग्राफीसह स्विमिंग करतानादेखील फोन वापरू शकता. फोन वॉटरप्रूफ बनवण्यासाठी ‘एनी डिव्हाईस वॉटरप्रूफ’ (Any Device Waterproof) हे गॅजेटस विकत घ्या. ॲमेझॉनवरून हे गॅजेट विकत घेऊ शकता.

आणखी वाचा : युट्यूबवर विना जाहिरात व्हिडीओ पाहण्यासाठी वापरा ही सोप्पी ट्रिक

वॉटरप्रूफ पाउच
स्मार्टफोनला वॉटरप्रूफ बनवण्यासाठी तुम्ही वॉटरप्रूफ पाउचचा वापर करू शकता. याची किंमत ५० रुपयांपासून सुरू होते. हा पाउच अमेझॉनवरून विकत घेऊ शकता. या पाउच किंवा ड्राय बॅगमध्ये फोन किंवा टॅबलेट सुरक्षित ठेऊ शकता. ही ड्राय बॅग घेऊन तुम्ही स्विमिंगला देखील जाऊ शकता. यासाठी एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ती म्हणजे या पाउचला किंवा बॅगला ४ ते ५ लॉक असतात. फोन किंवा टॅबलेट त्या बॅगमध्ये ठेवल्यानंतर हे लॉक व्यवस्थित बंद करा, त्यात पाणी जाणार नाही याची काळजी घ्या.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.