November 27, 2022
बजेट फ्रेंडली विमान प्रवास

ट्रेनचा प्रवास किंवा कार मधून प्रवास कितीही आवडीचा असला किंबहुना फॅन्सी वाटत असला तरी एकदा विमानात बसावं अशी इच्छा प्रत्येकाची असते. पांढऱ्या शुभ्र ढगातून निळ्याशार आकाशात एखाद्या पक्षाप्रमाणे उडणाऱ्या विमानात बसून सोशल मीडियावर फोटो टाकत ‘बादल important है यार’ कॅप्शन टाकण्याचा विचार आपणही अनेकदा केला असेल ना.. तुमची ही इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकते, ती सुद्धा अगदी बजेट मध्ये! आपण जर या लेखात दिलेल्या काही खास टिप्स लक्षात ठेवून तिकीट बुकिंग केलं तर अगदी ट्रेनच्या खर्चात तुम्ही विमानाचा प्रवास करू शकता.

साधारणतः पाऊस झाल्यावर अनेकांचे फिरायचे प्लॅन ठरत असतात. नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये जर का आपणही सुट्टीचं प्लॅन करत असाल तर आतापासूनच तयारीला लागा. चला तर मग बजेट फ्रेंडली तिकीट बुकिंग पासूनच सुरुवात करूयात..

विमानाच्या तिकीट बुकिंग मध्ये पैसे वाचवण्याच्या टिप्स

वेळेआधी बूकींग

अचानक ठरणारे प्लॅन कितीही कमाल होत असले तरी जर का तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर निदान कुठे जायचं हे आधीच ठरवून बुकिंग करा. ऍडव्हान्स मध्ये बुक केलेल्या विमान तिकिटावर मोठ्या प्रमाणात सूट मिळते. साधारण पावसाच्या महिन्यांमध्ये अनेकजण विमान प्रवास टाळतात परिणामी अनेक विमान कंपनी तिकिटांवर मोठी सूट देतात.

बिनधास्त तुलना करा

आपण तिकीट बुकिंग करताना विविध कंपनी, वेबसाईट व सर्च इंजिन तपासून पहा. प्रत्येक सर्च इंजिनवर तिकिटाचे दर वेगवेगळे असतात त्यामुळे नीट तुलना करून यातील बेस्ट डील आपल्यासाठी निवडा. प्रवासाचे नियोजन करणाऱ्या अनेक ट्रॅव्हल कंपनीचे दर सुद्धा तुलना करून पहा.

Incognito मोड वापरा

अनेकदा आपण पाहिले असेल की विमानाच्या तिकिटाचा दर कमी असतो पण दोन दिवसांनी पाहिल्यावर अचानक ते दर वाढलेले असतात. यामध्ये वेळ या मुद्द्यासह तुम्ही किती वेळा ती साईट पाहता हे ही महत्त्वाचे असते. शक्यतो तिकीटची किंमत तपासताना इनकॉग्निटो मोड वापरा जेणेकरून तुमच्या अकाउंटला कोणतेही कुकीज ऍड होणार नाहीत.

ग्रुप बुकिंग टाळा

समजा तुम्ही कूपन वापरून किंवा कंपनीची अमुक टक्के सूट अशी ऑफर वापरून बुकिंग करणार असाल तर सूट देण्याची रक्कम ही अगोदरच ठरलेली असते. तुम्ही एका तिकिटाचे बूकिंग केल्यास तुम्हाला कमी रक्कमेवर ती सूट मिळते आणि खर्च कमी होतो. पण जर तुम्ही ग्रुप बुकिंग करत असाल तर डिस्काउंटची एकच रक्कम लागू होते आणि किंमतीत फार फरक दिसत नाही. कदाचित तुम्हाला एकत्र बसायला मिळणार नाही हा मुद्दा यात समस्या ठरू शकतो पण जर तुम्ही एकाच वेळी वेगळ्या डिव्हाईस वरून इतरांचे बुकिंग केले तर ही समस्या सुद्धा सुटेल.

Up To Date रहा

अनेक विमान कंपनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध ऑफर्सची माहिती देत असतात. जर फिरायला जाण्याचा तुमचा प्लॅन ठरणारच असेल तर या कंपन्यांचे वेबसाईट, सोशल मीडिया पेज वेळोवेळी तपासात रहा.

विमानासोबतच आपण हॉटेल्स व फिरण्यासाठीच्या ठिकाणी सुद्धा वाहनांचे बुकिंग आगाऊ करून ठेवल्यास मोठी रक्कम वाचवता येईल. तुमच्या पुढच्या ट्रिपसाठी ऍडव्हान्स मध्ये हॅप्पी जर्नी!Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.