January 27, 2023
VIDEO: “मोदी महिमा अपरंपार आहे”, फारुक अब्दुल्लांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत भाजपाचा खोचक टोला

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी जम्मू काश्मीरचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांचा एक व्हिडीओ पोस्ट करत ‘मोदी महिमा अपरंपार’ असा खोचक टोला लगावला आहे. या व्हिडीओत फारुक अब्दुल्ला एका कार्यक्रमात उपस्थितांसमोर ‘चलो बुलावा आया हैं, माताने बालाया हैं’ हे प्रसिद्ध गाणं म्हणताना दिसत आहेत. इतकंच नाही, तर गाणं म्हणताना त्यांनी ठेकाही धरलेला दिसतो. अतुल भातखळकर यांनी सोमवारी (३ ऑक्टोबर) हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

अतुल भातखळकर म्हणाले, “फारुक अब्दुल्ला यांचे जय मातादी. मोदी महिमा अपरंपार आहे!”

हेही वाचा : ‘आम्हीही तेच म्हणत होतो, हे जाणते राजे नाहीत, हे तर….’; शरद पवारांच्या एंट्रीला लावलेल्या ‘त्या’ गाण्यावरुन अतुल भातखळकरांचा टोला

भातखळकरांनी आत्ता हा व्हिडीओ ट्वीट केला असला, तरी हा व्हिडीओ बराच जुना आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ऑक्टोबर २०१५ हा व्हिडीओ पोस्ट केला होता. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी २०१५ मध्ये जम्मूमधील रघुनाथ बजार येथे भेट दिली होती. तेथे त्यांनी नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी होत वैष्णवी देवी भक्तांसमोर ‘माता का बुलावा है’ हे गाणं गात ठेका धरला होता.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.